अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी 'जग बदलणारे १२ जीनियस' हा पुस्तकांचा संच लिहून प्रकाशित केला आहे. खाली दिलेल्या पुस्तकांच्या यादी या संचातील पुस्तकांची नावे आली आहेत.
बालपण
अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रामुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असतानाच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्रावीण्य मिळवले.
शैक्षणिक अर्हता
दहावीच्या परीक्षेत सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण .
पहिली ते आय.आय.टीच्या जवळजवळ सर्व परीक्षांत त्यांनी गणितात सर्वोच्च गुण पारितोषिके मिळवली.
भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधून १९७२ साली उत्तीर्ण झालेले (आयआयटीचे) केमिकल इंजिनिअर आहेत.
कारकीर्द
अच्युत गोडबोले यांनी एकेकाळी संगणक आणि त्याचं तंत्रज्ञान समजायला जड जात आहे; म्हणून चक्क ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे त्यांनीच संगणकाशी संबंधित असलेल्या अनेक जगद्विख्यात कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार म्हणून पदे सांभाळली; अमेरिकेतल्या "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘च्या ५०व्या मजल्यावर कार्यालय स्थापून कंपन्यांच्या वतीने काही कोटींचे करार-मदार केले आणि संगणक या विषयावर ७००-८०० पृष्ठांचे चार चार ग्रंथही लिहिले. वर्षाला दोन कोटी रुपये पगाराची नोकरी नाकारून अच्युत गोडबोले यांनी केवळ लेखनालाच वाहूनही घेण्यासाठी संगीत, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, ,
मानसशास्त्र , या विषयात लिखाणाला सुरुवात केली.
व्यावसायिक कारकीर्द
सॉफ्टवेर क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिका येथील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत ३२ वर्षांचा अनुभव आणि कामानिमित्त जगभरात १६० वेळा प्रवास.
पटणी, सिंटेल, एल अँड टी इन्फोटेक, अपार, दिशा, वगैरे अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असताना त्यांच्या जगभरच्या अनेक पट वाढीसाठी सक्रिय हातभार.
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे . टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी संगणकावरची ‘ओपरेटिंग सिस्टिम्स’, डेटा कम्युनिकेशन्स अँड नेटवर्क्स’, ‘वेब टेक्नॉलॉजीज’ आणि डीमिस्टिफाईंग कम्प्युटर्स’ या प्रत्येकी ५००-७०० पानी चार पाठ्यपुस्तकांचे लेखन. या पुस्तकांचे चिनीसकट जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत.
समाजसेवा
चमकदार व्यावसयिक कारकीर्दीनंतर निवृत्तीपश्चात गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. [ संदर्भ हवा ] भिल्ल आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली, आणि दहा दिवसांची कैद भोगली. [१]. ‘आशियाना’ नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा सुरू करण्यात अच्युत गोडबोले यांचा पुढाकार होता. आशियाना नावाची आत्ममग्न मुलांची शाळा चालवण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.[१]
^अच्युत गोडबोले,, अतुल कहाते (२००२). बोर्डरुम. पुणे: राजहंस प्रकाशन प्रा. ली. pp. २१६. ISBN९७८८१७४३४२२२५ Check |isbn= value: invalid character (सहाय्य).CS1 maint: extra punctuation (link)