निनाद बेडेकर |
---|
निनादराव बेडेकर |
जन्म नाव |
निनाद गंगाधर बेडेकर |
---|
जन्म |
१७ ऑगस्ट १९४९ |
---|
मृत्यू |
१० मे, २०१५ (वय ६५) |
---|
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
---|
कार्यक्षेत्र |
इतिहाससंशोधन, साहित्य |
---|
भाषा |
मराठी |
---|
साहित्य प्रकार |
इतिहाससंशोधन, साहित्य |
---|
विषय |
शिवकालीन इतिहास |
---|
वडील |
गंगाधर बेडेकर |
---|
निनादराव बेडेकर हे एक मराठी इतिहासकार होते. छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांचा विशेष अभ्यास होता. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गडकिल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते.[ संदर्भ हवा ] अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, छ्त्रपती शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय कौशल्ये आजच्या 'एमबीए'वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही त्यांनी भाषणे दिली होती.[ संदर्भ हवा ] विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ते व्याख्यानमाला आयोजित करत.
वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.[ संदर्भ हवा ]
शिवकालीन इतिहासाबद्दलची त्यांची ही तळमळ लक्षात घेऊन, छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आणि गडकिल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीचे प्रमुख मार्गदर्शक निनाद बेडेकर होते.[ संदर्भ हवा ]
महाराष्ट्रातील ट्रेकिंग करणाऱ्या अनेक संस्थांशी निनाद बेडेकरांचा मैत्रिपूर्ण संबंध होता. किल्ल्यांवर भटकंतीसाठी जाणाऱ्या अनेक तरुण मुलामुलींना त्यांनी ऐतिहासिक विषयांसंबंधीचे मार्गदर्शन केले होते.[ संदर्भ हवा ]
निनाद बेडेकर यांनी लिहिलेली पुस्तके [ संदर्भ हवा ]
- अजरामर उद्गार (ऐतिहासिक)
- आदिलशाही फर्माने (ऐतिहासिक; सहलेखक - गजानन भास्कर मेहेंदळे, डॉ.रवींद्र लोणकर
- गजकथा (ऐतिहासिक)
- छत्रपती शिवाजी (चरित्र)
- झंझावात : मराठ्यांची यशोगाथा (ऐतिहासिक)
- थोरलं राजं सांगून गेलं (ऐतिहासिक ललित)
- रघुनाथ यादव चित्रगुप्त बखर पानिपतची (संपादक-अनवाद - उदय कुलकर्णी, लिप्यांतर - निनाद बेडेकर)
- विजयदुर्गाचे रहस्य (पर्यटनविषयक)
- शिवभूषण (ऐतिहासिक)
- समरांगण (बालसाहित्य)
- दुर्गकथा
- पानिपतचा रणसंग्राम, मराठे विरुद्ध अफगाण १४ जान्युअरी १७६१
- कालातीत व्यवस्थापन तत्त्वे
- दुर्गवैभव
- इतिहास दुर्गांचा
- महाराष्ट्रातील दुर्ग
जीवन
पुरस्कार
संदर्भ
मराठी साहित्यिक |
---|
अ | |
---|
आ | |
---|
इ | |
---|
उ | |
---|
ए | |
---|
ऐ | |
---|
ओ | |
---|
क | |
---|
ख | |
---|
ग | |
---|
घ | |
---|
च | |
---|
ज | |
---|
ट | |
---|
ठ | |
---|
ड | |
---|
ढ | |
---|
त | |
---|
|