अजीम नवाज राही

अजीम नवाज राही (इ.स. १९६५ -) हे मराठी भाषेतील लेखक आणि कवी आहेत.

त्यांनी गंभीर कविता लिहील्या तसेच सूत्रसंचालनाची श्रोताप्रिय शैली त्यांनी विकसित केली आहे.[ संदर्भ हवा ]

जीवन

यांचा जन्म साखरखेर्डा, तालुका सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे झाला.

राही यांचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण साखरखेर्डा (जि. बुलडाणा) या गावी उर्दू माध्यमातून झाले. गावात त्या पुढील शिक्षण उर्दू माध्यमातून उपलब्ध नसल्याने राही यांना इयत्ता आठवीमध्ये मराठी माध्यमात प्रवेश घेतला. ते इयत्ता दहावीत मराठीत नापास झाले. यामुळे त्यांनी शिक्षण सोडले. कालांतराने दहावीच्या मराठी भाषेच्या पुस्तकात राही यांच्या कवितेचा समावेश आहे.[ संदर्भ हवा ]

हे पैनगंगा सहकारी सूत गिरणी येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

लेखन

त्यांच्या कवितांचे इंग्रजी तसेच हिंदी भाषेतही अनुवाद झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

महाराष्‍ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या मराठी पुस्तकात या संग्रहातील आधी ‘दुष्काळ’ नंतर ‘पडझड’ या दोन कवितांचा समावेश केला.

शिवाय गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत विद्यापीठ, अमरावती यांनी आपल्या अभ्यासक्रमात ‘कल्लोळातला एकांत’मधील कवितांचा समावेश केला.

पुस्तके

कविता संग्रह

  • व्यवहारांचा काळा घोडा
  • वर्तमानाचा वतदार
  • कल्लोळातला एकांत

पुरस्कार

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!