छत्तीसगढचा मुख्यमंत्री हा भारताच्या छत्तीसगढ राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व छत्तीसगढच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ छत्तीसगढ राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.
२००० सालच्या छत्तीसगढ राज्याच्या स्थापनेनंतर आजवर एकूण ४ व्यक्ती छत्तीसगढच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. भारतीय जनता पक्षचे विष्णुदेव रामप्रसाद साई हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्र्यांची यादी
छत्तीसगढमधील राष्ट्रपती राजवट तपशील
छत्तीसगढमध्ये आत्तापर्यंत एकदाही राष्ट्रपती राजवट लावण्यात आली नाही.
संदर्भ आणि नोंदी