इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९३० दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. न्यू झीलंडने या दौऱ्यात पहिला वहिला कसोटी सामना खेळला.
याच वेळेस फ्रेडी कॅल्थोर्प याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दुसरा संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच वेळ अशी होती की एका देशाने एकाच दिवशी दोन कसोट्या खेळल्या.