पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने ४९८ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडने २०१८ साली स्थापलेला वनडेतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला. तसेच लिस्ट-अ क्रिकेटमधील देखील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. इंग्लंडने पहिला सामना २३२ धावांनी जिंकला. नेदरलँड्सचा कर्णधार पीटर सीलार याने पाठीच्या दुखण्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने शेवटच्या दोन सामन्यांकरिता स्कॉट एडवर्ड्सला नेदरलँड्सचा कर्णधार नेमले गेले. इंग्लंडने दुसरा सामना जिंकत मालिकाविजय नोंदवला.