१९५२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताने पहिल्यांदाच सार्वभौम राष्ट्र म्हणून भाग घेतला. हेलसिंकी शहरातील या स्पर्धेत भारताच्या ६४ खेळाडूंनी ११ खेळांतील ४२ प्रकारात भाग घेतला.
यात हॉकी संघाने सुवर्णपदक मिळवले आणि खाशाबा जाधव यांनी फ्रीस्टाइल बॅन्टमवेट कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवले. जाधवांचे हे पदक पुढील अनेक दशके भारतासाठी मिळवलेले एकमेव व्यक्तिगत पदक होते.