बौद्ध ध्वज किंवा पंचशील ध्वज हा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बौद्ध धम्माचे प्रतिक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला ध्वज आहे.[१] जगभरातील बौद्ध अनुयायी या ध्वजाचा प्रयोग अथवा उपयोग करतात.
इतिहास
ध्वज मूलतः रचना इ.स. १९८५ मध्ये कोलंबो समिती, कोलंबो, श्रीलंका येथे झाली[२] व या समितीत पुढील सदस्य होते, पूज्य हिक्कादुवे सुमंगल थेरा (अध्यक्ष), पूज्य मीगेत्तूवेत्ते गुनानंद थेरा, डोनाल्ड डॉन कारोलीस हेवाविथारणा (Don Carolis Hewavitharana), अन्द्रीस बायर धम्मगुणवर्धना (Andiris Baer Dharmagunawardhana), चार्ल्स ए. डिसिल्व्हा, पीटर डी. अब्रेऊ, विल्यम डी अब्रेऊ, विल्यम एल. फर्नांडोचा, एन,एस. फर्नांडोचा आणि कार्लिस पुजीथा गुणवर्धना (सचिव) यांचा समावेश होता.[३]
बौद्ध ध्वज हा सर्वप्रथम २८ मे १८८५ रोजी वैशाख पौर्णिमा[४] (बुद्ध जयंती) या सणाच्या ब्रिटिश साम्राज्याखालील सुट्टीचा दिवशी फडकवण्यात आला.कर्नल हेन्री स्टील ओल्कोट या अमेरिकन पत्रकारांनी त्यात थोडा बदल सुचवला.
संप्रदायिक बौद्ध ध्वज कई वेगवेगळ्या बौद्ध विहारमध्ये फडकतात. तथापि, त्यांची स्वतःची काही विशिष्ठ शिकवणीमुळे बौद्ध ध्वजातील रंगामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे.
^"Archived copy". 24 September 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-09-24 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)