इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९३४-३५
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९३४ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. याच दौऱ्यात २८ डिसेंबर १९३४ रोजी ब्रिस्बेन येथे इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला या संघांमध्ये जगातील पहिला महिला कसोटी सामना खेळविला गेला. इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळले तर नंतर न्यू झीलंडविरुद्ध एक महिला कसोटी सामना खेळवला गेला.
महिला ॲशेस
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९३४-३५
इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
इंग्लंड महिलांनी ३ सामन्यांची महिला ॲशेस मालिका २-० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मार्गरेट पेडेन हिने तर बेटी आर्चडेलकडे इंग्लंडचे कर्णधारपद सोपविण्यात आले. प्रथम महिला कसोटी सामन्यासाठी तत्कालिन ५ पाच कसोटी देशांच्या पुरूष संघाचे कर्णधार हजर होते. ऑस्ट्रेलियाच्या पुरूष संघाचे कर्णधार बिल वूडफुल, न्यू झीलंडचे कर्ली पेज, इंग्लंडचे बॉब वायट, वेस्ट इंडीजचे जॅकी ग्रांट, दक्षिण आफ्रिकेचे जॉक कॅमेरॉन आणि भारताचे कर्णधार सी.के. नायडू ह्या सर्वांनी महिला खेळाडूंचे क्रिकेट विश्वात स्वागत करत सामन्याला उपस्थित राहिले.
इंग्लंड महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
महिला ॲशेस संपताच इंग्लंड संघाने शेजारील देश न्यू झीलंडकडे प्रस्थान केले. तेथे इंग्लंडने न्यू झीलंड महिलांसोबत एक महिला कसोटी खेळली. रुथ सायमन्सने न्यू झीलंडचे कसोटीत नेतृत्व केले. न्यू झीलंड संघाने महिला कसोटी पदार्पण केले. इंग्लंड महिलांनी सामन्यावर प्रभुत्व गाजवत कसोटी १ डाव आणि ३३७ धावांनी जिंकली. परतीच्या प्रवासात इंग्लंड संघाने अमेरिका, कॅनडा मध्ये थांबत स्थानिक महिला संघांशी १५ तीन-तीन दिवसांचे सामने खेळले.