अनंत काकबा प्रियोळकर (५ सप्टेंबर, इ.स. १८९७ - १३ एप्रिल इ.स. १९७३ हे इतिहास व भाषा विषयांमधील संशोधक व मराठी लेखक होते. त्यांच्या प्रेरणेने मुंबईत मराठी संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली.
जीवनपट
शिक्षण
अनंत काकबा प्रियोळकर ह्यांचा जन्म गोव्यातील फोंडे तालुक्यातील प्रियोळ ह्या गावातील कोने ह्या भागात झाला. त्यांचे प्राथमिक मराठी शिक्षण त्यांच्या आजोळी तिसऱ्या इयत्तेपर्यंत झाले. १९१०मध्ये प्रियोळकर पोर्तुगीज सेगुंद ग्राव (पाचवी इयत्ता) ही परीक्षा उत्तीर्ण झाले. फोंडा येथील अल्मैद कॉलेज ह्या संस्थेत त्यांनी हायस्कूल स्तरावरील शिक्षण घेतले. दत्तात्रेय विष्णू आपटे आणि हरी गणेश फाटक हे त्यांचे शिक्षक होते. १८१८मध्ये प्रियोळकर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याआधी १९१६ ते १९१७ ह्या कालावधीत प्रियोळकर ह्यांनी असोळणे (गोवे) येथे शिक्षकाची नोकरी केली.
पुढील शिक्षणासाठी प्रियोळकरांनी धारवाड येथील कर्नाटक कॉलेजात प्रवेश घेतला. १९१९ ते १९२२ ह्या काळात प्रियोळकर तिथे शिकत होते. १९२२ ह्या वर्षी प्रियोळकर सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी रुजू झाले. प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ पां. दा. गुणे ह्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना येथे लाभ झाला.
१९२३ ह्या वर्षी प्रियोळकर मुंबई विद्यापीठाची बी. ए. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवीधर झाले.
चित्रकलेची आवड
प्रियोळकरांना चित्रकलेची आवड असल्याने त्यांना आल्मैद कॉलेजात शिकत असताना चित्रकलेच्या परीक्षांना बसण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते. पुढील काळात प्रियोळकर लेखक म्हणून प्रसिद्धीस पावले असले तरी त्यांची चित्रकलेची आवड टिकून राहिली. त्यांनी तयार केलेले सार्वजनिक काका (गणेश वासुदेव जोशी) ह्यांचे चित्र पुण्यातील सार्वजनिक सभेत लावण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या चरित्रकारांनी दिली आहे.
प्रकाशित साहित्य
- दि गोवा इन्क्विझिशन (मुंबई विद्यापीठ प्रेस, १९६१)[६]
- ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली
- दमयंती स्वयंवर (आध्यात्मिक)
- दि प्रिंटिंग प्रेस इन इंडिया (मराठी संशोधन मंडळ, मुंबई १९५८)
- प्रिय आणि अप्रिय (माहितीपर)
- लोकहितवादीकृत निबंध संग्रह (संपादित, ललित प्रकाशन)
गौरव
पुरस्कार
डाॅ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई विद्यापीठात सादर झालेल्या सर्वोत्कृष्ट प्रबंधांना पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार मिळालेले काही विद्वान :
- डाॅ. अरुण टिकेकर
- डाॅ. अरुणा ढेरे
- डाॅ.उषा मा. देशमुख
- डाॅ. वि.रा. करंदीकर
- डाॅ. वि.भि. कोलते
- डॉ. प्रकाश खांडगे [७]
संदर्भ
संदर्भसूची
मराठी साहित्यिक |
---|
अ | |
---|
आ | |
---|
इ | |
---|
उ | |
---|
ए | |
---|
ऐ | |
---|
ओ | |
---|
क | |
---|
ख | |
---|
ग | |
---|
घ | |
---|
च | |
---|
ज | |
---|
ट | |
---|
ठ | |
---|
ड | |
---|
ढ | |
---|
त | |
---|
|