डॉ. दत्तात्रेय दि. पुंडे (जन्म : २६ डिसेंबर १९३८)[१] हे मराठी भाषाविषयक पुस्तके लिहिणारे एक लेखक आहेत. ते पुण्याच्या मॉडर्न कॉलेजात मराठीचे प्राध्यापक होते. संशोधक, समीक्षक, अध्यापक, संपादक म्हणून ते परिचित आहेत.[१]
शिक्षण व संशोधन
त्यांनी 'वि. वा. शिरवाडकर : एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर केलेल्या संशोधनाला १९८० साली पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी मिळाली. या प्रबंधास १९८० या वर्षी सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीची, डॉ. य. वि. परांजपे आणि डॉ. वि. रा. करंदीकर पारितोषिके प्राप्त झाली. [१]
कुसुमाग्रज यांचे साहित्य, वाड्मयेतिहास आणि भाषाशास्त्र व भाषाविषयक लेखन ही त्यांच्या अभ्यासाची क्षेत्रं आहेत. [१]
पुंडेंची पुस्तके
द.दि. पुंडे यांची पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:
- कुसुमाग्रज : एक शोध (१९८९)
- कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उगम आणि विकास (१९९७)
- गंमत शब्दांची (मुलांसाठी)
- गांवगाडा (नवीन आवृत्तीचे संपादन; पुस्तकाचे मूळ लेखक - त्रिंबक नारायण आत्रे)
- ग्रंथदर्शन
- भयंकर सुंदर मराठी भाषा
- भारतीय साहित्याची संकल्पना (डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर गौरवग्रंथ, सहसंपादिका - पद्मजा घोरपडे)
- भाषाविज्ञान परिचय (सहलेखक - डॉ. अंजली सरदेसाई, डॉ. स.गं. मालशे
- मराठी वाङ्मयाची सद्यस्थिती (सहलेखिका - डॉ. विद्यागौरी टिळक)
- महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार (संपादित, सहसंपादक - यशवंत सुमंत)
- वाङ्मयेतिहास : एक मुक्त संवाद (सहलेखक - प्रा. गो.म. कुलकर्णी)
- वाड्मयेतिहासाची संकल्पना (संपादित)
- व्यावहारिक मराठी (अभ्यासक्रमातील पुस्तक, सहलेखक - डॉ. कल्याण काळे)
- वि. वा. शिरवाडकर यांच्या नाट्यलेखनाचा शोध-अभ्यास
- गांधीवाद आणि आधुनिक मराठी साहित्य (संपादित)
योगदान
- ‘मराठी वाङ्मयाचा भारत क्षेत्रीय अभ्यास’ ही संकल्पना त्यांनी आवर्जून दृढमूल केली. कारण मराठी वाङ्मय हे मध्ययुगापासूनच भारताच्या सर्व प्रांतामध्ये निर्माण होते आहे हे त्यांना स्वतःच्या अभ्यासातून गवसले. त्यामुळे परप्रांतातल्या मराठी अभ्यासकांचे ते आधारस्तंभ झाले.[१]
- 'वाङ्मयेतिहासाचे तत्त्वज्ञान’ ही नवीन विद्याशाखा निर्माण झाली त्याचे श्रेय पुंडे यांच्याकडे जाते. आणि याचा परिणाम म्हणजे पुणे विद्यापीठानंतर इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा ‘वाङ्मय इतिहासाचे तत्त्वज्ञान’ या विषयाचा अभ्यासक्रम सुरू झाला. त्यांना वाड्मयेतिहासाचे तत्त्वज्ञान या विषयासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. [१]
पुरस्कार
संदर्भ
- ^ a b c d e f g दै.सकाळ, पुणे-पुणे टुडे, १८.०१.२०२५, ज्ञानसाधनेत रमलेले एक व्रतस्थ ऋषितुल्य व्यक्तिमत्व
- ^ दै.लोकसत्ता, दि.१९.०१.२०२५, भाषा समृद्धीत पुंडे यांचे योगदान मोठे