२०१४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १७वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशातील इंचॉन ह्या शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर इ.स. २०१४ दरम्यान भरवण्यात आली.
ही स्पर्धा मिळवण्यासाठी इंचॉनसोबत भारताच्या दिल्ली शहराने निविदा पाठवली होती. परंतु भारत सरकारने ही स्पर्धा मिळवण्यासाठी फारसा उत्साह दाखवला नाही व १७ एप्रिल २००७ रोजी कुवेत शहरात झालेल्या बैठकीदरम्यान २०१४ एशियाडचे यजमानपद इंचॉनला दिले गेले. १९८६ मध्ये सोल तर २००२ मध्ये बुसान नंतर हा मान मिळवणारे इंचॉन हे दक्षिण कोरियामधील तिसरे शहर होते.
ह्या स्पर्धेसाठी भारत सरकारने ९५२ सदस्यांपैकी ६७९ सदस्यांच्या पथकाला इच्यियोनला जाण्याची परवानगी दिली. यात ५१६ खेळाडू होते.
१९ सप्टेंबर रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात हॉकीपटू सरदारासिंग हा भारतीय पथकाचा ध्वजवाहक होता.
इंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान
पदकतालिका
* यजमान देश (दक्षिण कोरिया)
बाह्य दुवे