२०१२ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १११ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ मे ते ११ जून, इ.स. २०१२ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
रफायेल नदालने नोव्हाक जोकोविचला 6–4, 6–3, 2–6, 7–5 असे हरवले.
ही स्पर्धा जिंकून रफायेल नदालने फ्रेंच ओपन विक्रमी ७वेळा जिंकण्याचा विक्रम केला. टेनिसच्या इतिहासामधील एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा सात वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
महिला एकेरी
मारिया शारापोव्हाने सारा एरानीला 6–3, 6-2 असे हरवले.
ही फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून ग्रँड स्लँम पूर्ण करणारी शारापोव्हा ही केवळ १०वी महिला आहे.
पुरूष दुहेरी
मॅक्स मिर्न्यी / डॅनियेल नेस्टरनी बॉब ब्रायन / माइक ब्रायनना 6–4, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंचीनी मारिया किरिलेंको / नादिया पेत्रोवाना 4–6, 6–4, 6–2 असे हरवले.
मिश्र दुहेरी
सानिया मिर्झा / महेश भूपतीनी क्लॉडिया यान्स / सान्तियागो गोन्झालेसना 7–6(7–3), 6–1 असे हरवले.
हे सुद्धा पहा