साहित्य अकादमी पुरस्कारसाहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
इ.स. २००८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील लेखक व कादंबरीकार श्याम मनोहर यांना उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी मिळाला.
इ.स. २०१० सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना ’अशी काळवेळ’ नावाच्या, मूळ शशी देशपांडेलिखित अ मॅटर ऑफ टाइम या पुस्तकाच्या अनुवादासाठी मिळाला.
भाषा
खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.[१]
साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे बालसाहित्य पुरस्कार(२०१२)
हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे शहरात २० नोव्हेंबर २०१२ रोजी, लेखक आणि समाजसेवक अनिल अवचट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नऊ कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन निबंधसंग्रह, एक विज्ञानकथा संग्रह आणि आठ अन्य बाल साहित्यासाठी योगदान करणारे लेखक पुरस्कारप्राप्त ठरले. मराठी भाषेतील लेखक बाबा भांड यांपैकी एक आहेत.