नारी शक्ती पुरस्कार हा एक भारत सरकार तर्फे दिला जाणारा, महिलांसाठींचा सर्वोच्च पुरस्कार आहे. असामान्य कर्तृत्त्व दाखवणाऱ्या व्यक्तिगत महिलेस किंवा संस्थेस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे सहा विविध वर्गवारीत दिला जातो.[१]
कठिन परिस्थितित एखादी महिला आपली हिम्मत आणि अंतस्थ शक्ती नुसार जे अतुल्य कार्य करते, त्याचा हा सन्मान असून याद्वारे महिला सशक्तीकरण आणि नारीशक्तीचा आदर समाजात वाढवणे हा उद्देश असून
अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे ८ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते[२][३] यात पुरस्कार विजेत्या महिलेस किंवा संस्थेस एक लाख रुपये आणि एक प्रमाण पत्र दिल्या जाते. या पुरस्काराची सुरुवात 'स्त्री शक्ती पुरस्कार' नावाने इ.स.१९९९ मध्ये झाली.[१]
पुरस्काराचे वर्गीकरण
या पुरस्काराचे नाव भारतीय इतिहासातील प्रसिद्ध
स्त्रियांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[४][५]
देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार
१८व्या शतकातील माळव प्रांतातील एक राणी
कण्णगी पुरस्कार
प्रसिद्ध तामिळ महिला 'कण्णगी'च्या नावावर आधारित.
माता जिजाबाई पुरस्कार
१७ शतकातील मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्या नावावर आधारित.
राणी गाएदिनलिउ ज़ेलियांग पुरस्कार
२०व्या शतकातील एक नागा आध्यात्मिक तथा राजनीतिक महिला, राणी गाएदिनलिउ ज़ेलियांगच्या नावावर आधारित.
^"Stree Shakti Puraskar"(PDF). Ministry of Women and Child Development. 10 January 2012 रोजी मूळ पान(PDF) पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
^"Women's Award". Ministry of Women and Child Development. 9 October 2001 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.