युएफा यूरो २०१२ (पोलिश: Mistrzostwa Europy w Piłce Nożnej 2012; युक्रेनियन: Чемпіонат Європи з футболу 2012) ही युएफाची १४वी युरोपियन फुटबॉल स्पर्धा ८ जून २०१२ ते १ जुलै २०१२ दरम्यान पोलंड व युक्रेन ह्या देशांनी एकत्रितपणे आयोजित केली. नेहमीप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये युरोपातील १६ राष्ट्रीय फुटबॉल संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात इटलीला हरवून स्पेनने अजिंक्यपद पटकावले.
यजमान पद निवड
यजमान पद मिळवण्यासाठी एकूण ५ देशांनी बोली लावली होती. बोलीच्या अंतिम फेरीत तीन देश उरले होते.[१]
मतदान निकाल
देश
मत
पोलंड – युक्रेन
८
इटली
४
क्रोएशिया – हंगरी
०
पोलंड-युक्रेनला निर्विवाद बहुमत मिळाल्यामुळे पुढील फेऱ्या रद्द करण्यात आल्या.[२]
गोल संख्या समसमान असल्यास अश्या खेळाडूला हा पुरस्कार दिल्या जातो ज्याने सर्वात जास्त गोल साहाय्य केले. गोल सहाय्यने देखिल जर विजेता ठरत नसेल तर सर्वात कमी वेळ खेळणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. फर्नंडो टॉरेस इतर ५ खेळाडूं सोबत गोल संख्येत बरोबरीत होता तर मारियो गोमेझ सोबत गोल साहाय्य मध्ये बरोबरीत होता. परंतु टोरेस मैदानात केवळ ९२ मिनिटे होता, त्यामुळे त्याला गोल्डन बूट पुरस्कार देण्यात आला.[१७]टॉरेस दोन युरो अंतिम सामन्यात गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला.[१८] नेदरलॅंड्सचा क्लास-यान हुंटेलार हा युरो २०१२ (पात्रता सामन्यासह) मध्ये १२ गोलां समवेत सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू ठरला.[१९]