ऑस्ट्रिया महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा
कुमुदु पेड्रीक (१२५)
अँड्रिया-मे झेपेडा (१११)
सर्वाधिक बळी
शेरॉन विथेनेज (७)
व्हॅलेंटिना अव्डीलाज (८)
ऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान इटलीचा दौरा केला. इटली महिलांनी या मालिकेद्वारे आपला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. सर्व सामने स्पिनासिटो मधील रोम क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले. योजनेनुसार ऑस्ट्रिया, इटली आणि जर्सी या तीन संघांमध्ये तिरंगी मालिका खेळवली जाणार होती परंतु जर्सीच्या माघार घेण्याने ऑस्ट्रिया आणि इटली मध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. इटालियन क्रिकेट बोर्डाने संघाच्या पहिल्या वहिल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यासाठी कुमुदु पेड्रीक हिला इटलीच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले. ऑस्ट्रियाचा हा पहिला द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी विदेश दौरा होता.
मे २०२० मध्ये जर्मनीविरुद्ध ५-० ने पराभव झाल्यावर अँड्रिया मे-झेपेडा हिने ऑस्ट्रियाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिल्यामुळे मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रियन क्रिकेट बोर्डाने गंधाली बापट हिला ऑस्ट्रियाच्या कर्णधारपदी नियुक्त केले. इटलीने पहिला सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत विजयी सुरुवात केली. हा इटली महिलांचा पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय होता. ऑस्ट्रिया महिलांनी मालिका ३-२ ने जिंकली आणि पहिला वहिला मालिका विजय संपादन केला.