स्पर्धा प्रथम गट पद्धतीने खेळवली गेली. सर्व संघांनी विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. गट फेरीचे सामने झाल्यावर गुणफलकातील अंतिम क्रमवारीनुसार उपांत्य सामने झाले. रोमेनिया ने सर्व गट सामने जिंकत पहिले स्थान पटकावले. रोमेनियाने चौथ्या स्थानावर असलेल्या सर्बियाला उपांत्य सामन्यात १० गडी राखत अंतिम सामना गाठला. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या बल्गेरियाची तिसऱ्या स्थानावर असलेल्या ग्रीसबरोबरची उपांत्य सामन्याची लढत पावसाचा व्यत्यत आल्याने रद्द करण्यात आली. गट फेरीत दुसऱ्या स्थानी राहिल्यामुळे बल्गेरिया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात रोमेनियाने बल्गेरियाचा ७ गडी राखून पराभत करत सोफिया ट्वेंटी२० चषक जिंकला. तरणजीत सिंग याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोमेनियाच्याच रमेश सथीसन याने स्पर्धेत सर्वाधिक १९७ धावा केल्या तर समी उल्लाह आणि पॅवेल फ्लोरिन ह्या जोडीने प्रत्येकी ७ बळी मिळवत स्पर्धेत आघाडीचे गोलंदाज ठरले.
बल्गेरिया ६१ धावांनी विजयी. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया पंच: इओनिस आफिथिनोस (ग्री) आणि सुदीप ठाकूर (रो) सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (बल्गेरिया)
नाणेफेक :सर्बिया, क्षेत्ररक्षण.
सर्बियाने बल्गेरियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
जॅकब अल्बिन, अस्वद खान (ब), विन्टले बर्टन, ब्रेट डेव्हिडसन, मायकेल डॉर्गन, निकोलस जॉन्स-विकबर्ग, स्लोबोडन टॉसिक, नेमंजा झिमोनजीक आणि वुकासिन झिमोंझिक (स) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
रोमेनिया ३ गडी राखून विजयी. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया पंच: स्टीफन नेरंडझिक (स) आणि निसर्ग शाह (ब) सामनावीर: रमेश सथीसन (रोमेनिया)
नाणेफेक :ग्रीस, फलंदाजी.
ग्रीस आणि रोमेनिया या दोन्ही देशांनी बल्गेरियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
ग्रीस आणो रोमेनिया या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात रोमेनियाने ग्रीसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
सय्यद अमानुल्लाह, स्पायरीडॉन गॅस्टेराटोस, निकोलॉस मॉरिकिस, स्पायरोस सिरिओटिस, थॉमस झोटोस (ग्री) आणि तरणजीत सिंग (रो) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.