पावसामुळे पहिला ट्वेंटी२० सामना अनिर्णित सुटला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली खरी परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या महिला ट्वेंटी२० सामन्यात वेस्ट इंडीज महिलांनी ५ गडी राखत थरारक विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दक्षिण आफ्रिकेने पहिले चार महिला एकदिवसीय सामने जिंकत मालिकाविजय मिळवला. वेस्ट इंडीजने पाचव्या आणि अखेरच्या महिला एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ४-१ अश्या विजयावर समाधान मानावे लागले.