२०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका
संघ
जिब्राल्टर
माल्टा
पोर्तुगाल
संघनायक
एडमंड पॅकार्ड
बिक्रम अरोरा
नज्जम शहजाद
सर्वात जास्त धावा
ख्रिस डेलानी (१५१)
वरुण थमोथराम (१६२)
अझहर अदनानी (२७६)
सर्वात जास्त बळी
एडमंड पॅकार्ड (४) ॲडम ओरफिला (४)
बिलाल मुहम्मद (५) वसीम अब्बास (५)
सिराजुल्लाह खदीम (९)
२०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका ही पोर्तुगालमध्ये १९ ते २२ ऑगस्ट २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान पोर्तुगालसह माल्टा आणि जिब्राल्टर या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता.
१ जानेवारी २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सर्व सदस्यांना बहाल केलेल्या ट्वेंटी२० दर्जानंतर प्रथमच पोर्तुगाल मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवण्यात आले. सर्व सामने अल्बेरगेरिया-ए-वेल्हा मधील गुचेरे क्रिकेट मैदान या मैदानावर खेळविण्यात आले. सदर तिरंगी मालिका गट फेरी या प्रकाराने खेळवली गेली. गट फेरीचे सर्व सामने खेळून झाल्यावर अव्वल स्थानावर असलेल्या संघास विजेते घोषित करण्यात आले.
पोर्तुगालने सर्व ४ सामन्यांमध्ये विजय मिळवत तिरंगी मालिका जिंकली. तर दोन विजयांसह माल्टाला उवविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जिब्राल्टरला एकही सामना जिंकता आला नाही.
गुणफलक
साखळी सामने
वि
झीशान खान ३९ (२१) सिराजुल्लाह खदीम २/२८ (४ षटके)
अझहर अदनानी ४६ (४२) बिलाल मुहम्मद १/१४ (४ षटके)
नाणेफेक : पोर्तुगाल, क्षेत्ररक्षण.
पोर्तुगालमध्ये खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
पोर्तुगाल आणि माल्टा मधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
माल्टाने पोर्तुगालमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात माल्टाला प्रथमच पराभूत केले.
अझहर अदनानी, अँथनी चेम्बर्स, सिराजुल्लाह खदीम, जुनैद खान, अमनदीप सिंग, मिगुयेल स्टोमन, आमिर झैब (पो) आणि जस्टिन शाजू (मा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
लुईस ब्रुस ६० (५३) वसीम अब्बास ३/२९ (४ षटके)
बिक्रम अरोरा ५९* (४९) ॲडम ओरफिला १/२० (३ षटके)
नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.
जिब्राल्टर आणि माल्टा मधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
जिब्राल्टरने पोर्तुगालमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
माल्टाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जिब्राल्टरला प्रथमच पराभूत केले.
लुईस ब्रुस, चार्ल्स हॅरिसन, पॅट्रीक हॅचमॅन आणि जोसेफ मार्पल्स (जि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
अझहर अदनानी १०० (५१) एडमंड पॅकार्ड ३/३४ (४ षटके)
जेम्स फिट्झगेराल्ड २७ (२५) जुनैद खान ३/२४ (४ षटके)
नाणेफेक : जिब्राल्टर, क्षेत्ररक्षण.
वि
वरुण थमोथराम १०४* (५२) केन्रॉय नेस्टर २/३२ (४ षटके)
ख्रिस डेलानी ६९* (३७) बिलाल मुहम्मद १/२९ (४ षटके)
नाणेफेक : जिब्राल्टर, क्षेत्ररक्षण.
रिचर्ड कनिंगहॅम (जि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
अझहर अदनानी ८१ (४५) जेम्स फिट्झगेराल्ड २/४७ (४ षटके)
पॅट्रीक हॅचमॅन २२ (२५) सिराजुल्लाह खदीम ३/१६ (४ षटके)
नाणेफेक : जिब्राल्टर, क्षेत्ररक्षण.
वि
वरुण थमोथराम ३६ (२७) सिराजुल्लाह खदीम ३/२४ (४ षटके)
अझहर अदनानी ४९ (४१) वसीम अब्बासी २/३० (३.५ षटके)
नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.
राहुल भारद्वाज, अर्स्लान नसीम आणि झुल्फिकार अली शाह (पो) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
मे २०२१ जून २०२१ जुलै २०२१ ऑगस्ट २०२१ सप्टेंबर २०२१ चालु स्पर्धा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे पोर्तुगाल दौरे
संपूर्ण सदस्यांचे दौरे
संपूर्ण सदस्यांच्या स्पर्धांचे आयोजन
अनेक संघ -
असोसिएट संघांचे दौरे
असोसिएट संघांची स्पर्धा
अनेक संघ