ऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्येऑस्ट्रियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन १९८० पासून ऑस्ट्रिया महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.
ऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला संघाने नॉर्वे महिलांविरुद्ध ३१ जुलै २०१९ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. त्यांच्या दुसऱ्याच सामन्यात जर्सी महिलांविरुद्ध ऑस्ट्रियाने पहिला वहिला महिला ट्वेंटी२० विजय मिळवला.