या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
सेतुमाधव पगडी (२७ ऑगस्ट, १९१०; - १४ ऑक्टोबर१९९४) हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे.
इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, सेतुमाधव पगडी यांनी विपुल प्रमाणात स्फुट लेखन व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला.
मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अश्या जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लर्नेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“, “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ आदी संंस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधव पगडींनी भूषविले आहे.
सेतुमाधव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९ पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.
गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
प्रकाशित साहित्य
इतिहास विषयक
इतर
समग्र सेतुमाधव पगडी
हैदराबाद येथील तेलंगण राज्य मराठी मराठी साहित्य परिषदेने 'समग्र सेतुमाधव पगडी' हा ग्रंथ संच प्रसिद्ध केला. ह्या ग्रंथ संचात सेतुमाधव पगडी यांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे ५ खंड, तसेच इंग्रजी लेखनाचे २ खंड आहेत. मराठी संचाची दुसरी आवृत्ती मे २०१७मध्ये काढण्यात आली.
"समग्र सेतुमाधवराव पगडी" - प्रमुख संपादक - द.पं.जोशी , उषा जोशी सहाय्यक संपादक - विद्या देवधर , धनंजय कुलकर्णी
मराठी :
खंड पहिला : आत्मचरित्र , ललित गद्य - संपादक : उषा जोशी
खंड दुसरा : इतिहास - संपादक : राजा दीक्षित
खंड तिसरा : इतिहास - संपादक : राजा दीक्षित
खंड चौथा : विविध विषय , संस्कृती विचार - संपादक : निशिकांत ठकार
खंड पाचवा : उर्दू साहित्य रंग १ - संपादक : अब्दुल सत्तार दळवी
खंड पाचवा : उर्दू साहित्य रंग २ - संपादक : अब्दुल सत्तार दळवी
इंग्रजी :
Complete Work of Setumadhavrao Pagdi Vol.1 - Edited by Dr.G.B.Degloorkar
Complete Work of Setumadhavrao Pagdi Vol.2 - Edited by Dr.G.B.Degloorkar
सन्मान आणि पुरस्कार
मराठवाडा विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानाची पदवी
पगडी यांच्या “जीवनसेतु“, “छत्रपती शिवाजी“ या त्यांच्या ग्रंथाना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार