भारतीय क्रिकेट संघाने जुलै आणि सप्टेंबर २०१७ दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[१][२][३] कसोटी मालिकेआधी, संघ कोलंबो येथे दोन दिवसीय सराव सामन्यामध्ये खेळले.[४][५][६]
महिन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर दिनेश चंदिमलकडे श्रीलंकेच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.[७] परंतू, पहिल्या कसोटी आधी चंदिमलला न्युमोनिया झाल्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.[८] नंतर पहिल्या कसोटीसाठी रंगना हेराथची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.[९] दुसऱ्या कसोटीसाठी चंदिमल कर्णधार म्हणून संघात परतला.[१०] भारताने कसोटी मालिका ३–० ने जिंकली. तीन किंवा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्यील हा भारताने परदेशात दिलेला पहिलाच व्हाईटवॉश.[११] तसेच १९६७-६८ मध्ये न्यू झीलंडला ३-१ने हरविल्यानंतर हा भारतीय संघाने प्रथमच परदेशातील मालिकेत तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला.[१२]
पलेकेले येथील दुसरा एकदिवसीय सामना हा श्रीलंकेचा ८०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१३] भारताने पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसहीत, मालिका खिशात घातली हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध सलग आठवा एकदिवसीय मालिकाविजय ठरला.[१४] आधी झिम्बाब्वे, बांगलादेश आणि नंतर भारताविरुद्ध झालेल्या पराभवामुळे, श्रीलंकेच्या निवडसमितीला राजीनामा देणे भाग पडले.[१५] भारताने एकदिवसीय मालिका ५–० अशी जिंकली आणि घरच्या मैदानावरील एकदिवसीय मालिकेमध्ये पहिल्यांदाच व्हाईटवॉशची नामुष्की श्रीलंकेवर ओढवली.[१६] भारताने एकमेव टी२० सामना सुद्धा ७ गडी राखून जिंकला.[१७]
दुसऱ्या कसोटी सामन्यात "धोकादायक पद्धतीने" चेंडू फेकून, एका सामन्याच्या बंदीसाठी पुरेसे दोष गुण मिळाल्यामुळे भारताच्या रविंद्र जडेजावर तिसऱ्या कसोटीसाठी बंदी घालण्यात आली.[२५] त्याच्याऐवजी अक्षर पटेलची निवड करण्यात आली.[२६]
दुसऱ्या कसोटीदरम्यान उद्भवलेल्या पाठीच्या दुखण्यामुळे श्रीलंकेच्या रंगना हेराथला तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली.[२७]
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने तिसऱ्या आणि चवथा सामन्यातून तरंगाला वगळण्यात आले. तिसऱ्या सामन्यासाठी चामर कपुगेडेराची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली,[२९] परंतु पाठीचे दुखणे वाढल्याने उर्वरित सामन्यांतून त्याला वगळण्यात आले आणि चवथ्या सामन्यासाठी कर्णधारपदाची सुत्रे लसित मलिंगाच्या हाती देण्यात आली.[३०]
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, दिनेश चंदिमलच्या उजव्या अंगठ्याला हेयरलाईन फ्रॅक्चर झाल्याने उर्वरित मालिकेतून त्याला वगळण्यात आले.[३१]
हार्दीक पंड्या हा पहिले प्रथम श्रेणी शतक कसोटीमध्ये झळकावणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. त्याने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात १०७ धावा केल्या. त्याने भारतीय फलंदाजातर्फे कसोटी क्रिकेटच्या एका सत्रातील सर्वाधिक ९९ धावांचा, विरेंद्र सेहवागने२००६ मध्ये रचलेला विक्रम मोडला.[३९]
हार्दीक पंड्याने कसोटीमध्ये एका षटकात भारतीय फलंदाजातर्फे सर्वाधिक २६ धावा करण्याचा विक्रम केला.[३९]
अकिला धनंजयचे (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्या पहिल्यांदाच ५ बळी.[४२]
महेंद्रसिंग धोणी आणि भुवनेश्वर कुमारची नाबाद १०० धावांची भागीदारी ही भारतातर्फे कोणत्याही संघाविरुद्ध आठव्या गड्यासाठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामधील सर्वोत्कृष्ट भागीदारी.[४२]
^मालिका सुरू होण्याआधी दिनेश चंदिमलची श्रीलंकेचा कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. परंतू न्युमोनिया झाल्याने तो पहिल्या कसोटीत खेळू सकला नाही आणि त्याच्या ऐवजी रंगना हेराथकडे कर्णधारपदाची सुत्रे सोपवण्यात आली.
^२र्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने उपुल तरंगावर दोन सामन्यांची बंदी लादली गेली. त्याच्या ऐवजी ३र्या सामन्यात चामर कपुगेडेराकडे कर्णधारपद दिले गेले, परंतू पाठीच्या दुखापतीमुळे ४थ्या सामन्यात लसित मलिंगाने संघाचे नेतृत्व केले.
^"भविष्यातील दौरे"(PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.