नीळकंठ खाडिलकर |
---|
जन्म |
६ एप्रिल १९३४ |
---|
मृत्यू |
२२ नोव्हेंबर २०१९ मुंबई |
---|
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
---|
भाषा |
मराठी |
---|
वडील |
यशवंत |
---|
"अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ (ऊर्फ निळूभाऊ) खाडिलकर (जन्म : ६ एप्रिल १९३४, मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१९[१]) हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होत. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत. निळूभाऊ खाडिलकरांचे "हिंदुत्व" हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या.
नीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांना इतिहाससाक्षर केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. ‘अग्रलेखांचा बादशहा’ ही नीळकंठ खाडिलकर यांची मराठी वाचकांमध्ये ओळख आहे. त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला. खाडिलकर यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील लोकांसाठी नीळकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी वापरली.
खाडिलकरांच्या अग्रलेखांचे ५हून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत.
प्रकाशित साहित्य (एकूण ४६ पुस्तके)
- टॉवर्स (परचुरे प्रकाशन)
- संत तुकाराम
- द्रौपदी (नाटक)
- मऱ्हाठाचि बोलु कौतुके (३६ अग्रलेखांचा संग्रह)
- महात्मा गांधी
- यशस्वी कसे व्हाल?
- राजे शिवाजी (या पुस्तकाच्या अडीच लाखाहून अधिक प्रती खपल्याचा तत्कालीन विक्रम)
- रामायण
- शूरा मी वंदिले (मनोरमा प्रकाशन)
- श्रीकृष्ण
- हिंदुत्व (परचुरे प्रकाशन)
इतर
- नवाकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अग्रलेखात "श्रीकृष्ण आयोगा"वर ताशेरे ओढण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
नीळकंठ खाडिलकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- महाराष्ट्र सरकारचा पत्रकारितेचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार (२००८)
- मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोनदा अध्यक्षपद.
- भाषिक वृत्तपत्र संघटना ‘आयएलएनए’चे चिटणीसपद.
- भारत सरकारकडून पद्मश्री.
- कऱ्हाडच्या ‘चौफेर’तर्फे ‘सुधारक’ कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार (२०११)
- मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे पुरस्कार.
- लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (२०१७)
बाह्य दुवे
मराठी साहित्यिक |
---|
अ | |
---|
आ | |
---|
इ | |
---|
उ | |
---|
ए | |
---|
ऐ | |
---|
ओ | |
---|
क | |
---|
ख | |
---|
ग | |
---|
घ | |
---|
च | |
---|
ज | |
---|
ट | |
---|
ठ | |
---|
ड | |
---|
ढ | |
---|
त | |
---|
|
- ^ "ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचं निधन". Maharashtra Times. 2019-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-22 रोजी पाहिले.