जनता दल (संयुक्त)

जनता दलाचा ध्वज

जनता दल (संयुक्त) हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे. सध्या हा पक्ष प्रामुख्याने बिहारझारखंड ह्या राज्यांमध्ये कार्यरत असून नितीश कुमार हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत तर १५व्या लोकसभेमध्ये जनता दलाचे २० खासदार आहेत.

२००३ साली जनता दल ह्या पक्षाच्या अनेक गटांनी एकत्रित येऊन संयुक्त जनता दलाची स्थापना केली. स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या जे.डी.यू.ने २०१३ साली एन.डी.ए.मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१४ सालातील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पुढे आणण्याची भाजपची घोषणा हे ह्यामागील प्रमुख कारण होते. आता २०१७ मद्ये पुन्हा भाजपा बरोबर युती केली आहे. आणि बिहार मद्ये सत्तेत आहे

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!