या स्पर्धेत सहा देशांतील ट्वेंटी२० स्पर्धांमध्ये उच्चक्रम मिळवणाऱ्या दहा संघांना निमंत्रित केले गेले आहे. हे संघ साखळी तसेच बाद फेरीत मिळून एकूण २३ सामने खेळतील. एखादा सामन्यात दोन्ही संघ समसान ठरले तर सुपर ओव्हरने सामन्याचा निकाल ठरविण्यात येईल.
साखळी सामन्यांसाठी पाच संघांचे दोन गट केले गेले आहेत व त्यातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरी खेळतील. त्यांतील विजेते संघ स्पर्धाविजेतेपदासाठी अंतिम सामना खेळतील.[३]
साखळी सामन्यात खालीलप्रमाणे गुण दिले जातील.
निकाल
गुण
विजय
२ गुण
अनिर्णित
१ गुण
पराभव
० गुण
पारितोषिकाची रक्कम
मागील स्पर्धेप्रमाणे यातील पारितोषिकांची एकूण रक्कम ६० लाख अमेरिकन डॉलर असेल. त्यांची विभागणी खालीलप्रमाणे आहे.
या वर्षीच्या स्पर्धेत मागील स्पर्धेपेक्षा दोन संघ कमी आहेत कारण इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट संघांनी त्यांच्या वेळापत्रकात स्पर्धेच्या तारखा बसत नसल्याकारणाने माघार घेतली.[४] यामुळे स्पर्धेचा आराखडा बदलण्यात आला. फेब्रुवारी २०१०मध्ये पाकिस्तानच्याइजाझ बटने २०१० भारतीय प्रिमीयर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा अवमान झाल्याचे कारण सांगून पाकिस्तानी खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेण्यास बंदी करण्यात आल्याचे वृत्त आहे.[५] नंतर बटने आपण असे न म्हणल्याचे सांगितले परंतु तोपर्यंत स्पर्धेच्या आयोजकांनी पाकिस्तानला वगळण्याचे निश्चित केले होते.[६]
मागील स्पर्धेतील फक्त तीन संघ यावर्षीच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. गतविजेता न्यू साउथ वेल्स ब्ल्यु संघही पात्र ठरला नाही.[७]
काही खेळाडू या स्पर्धेतील एकापेक्षा जास्त संघांतून खेळण्यास पात्र आहेत. अशा खेळाडूंना आपल्या मायदेशातील संघातून खेळण्यास परवानगी आहे. जर असा एखादा खेळाडू वेगळ्या संघासाठी खेळला तर त्या संघाला त्याच्या देशातील संघाला २,००,००० अमेरिकन डॉलर द्यावे लागतील.[३] बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाने असे तीन खेळाडू आपल्याकडून खेळण्यासाठी राखून ठेवले आहेत.[८]
ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील चार शहरांतून खेळली जाईल. वॉरियर्स आणि लायन्स संघांना त्यांचे काही सामने सेंट जॉर्जेस पार्क आणि वाँडरर्स मैदान या घरच्या मैदानांवर खेळायला मिळतील. उपांत्य सामने सहारा मैदान किंग्समीड आणि सुपरस्पोर्ट पार्क येथे तर अंतिम सामने वाँडरर्स मैदानावर खेळण्यात येईल.[११]