Lorenzo de Médici (es); Lorenzo de' Medici (is); Lorenzo de' Medici (ms); Lorenzo de' Medici (en-gb); Лоренцо де Медичи (Великолепни) (bg); Lorenzo de' Medici (tr); 羅倫佐·德·麥地奇 (zh-hk); Lorenzo de' Medici (mg); Lorenzo di Piero de' Medici (sk); Лоренцо Медічі (uk); 洛倫佐·德·美第奇 (zh-hant); 洛伦佐·德·美第奇 (zh-cn); Lorenzo de' Medici (sc); 로렌초 데 메디치 (ko); Lorenzo de Mediĉo (eo); Lorenzo I. Medicejský (cs); Lorenzo de Medici (bs); Laurent le Magnifique de Médicis (fr); Lorenzo de' Medici (hr); लॉरेंझो दे मेदिची (mr); Lorenzo de' Medici (vi); Lorenco de Mediči (lv); Lorenzo de' Medici (af); Лоренцо Медичи (sr); Lourenço de Médici (pt-br); 洛伦佐·德·美第奇 (zh-sg); Lorenzo de' Medici (nn); Lorenzo de' Medici (nb); Lorenso Mediçi (az); Lorenzo de' Medici (en); لورينزو دي ميديشي (ar); Lorenzo il Magnifico (br); 羅倫佐·德·麥地奇 (yue); Lorenzo de’ Medici (hu); Lorentzo Medici (eu); Lorenzo de Médici (ast); Lorenzo de Mèdici (ca); Күркәм Лоренцо (ba); Lorenzo de’ Medici (de); Ларэнца Медычы (be); لورنتزوی مدیچی (fa); 洛伦佐·德·美第奇 (zh); Lorenzo de' Medici (da); ლორენცო მედიჩი (ka); ロレンツォ・デ・メディチ (ja); لورينزو دى ميديشى (arz); לורנצו דה מדיצ'י (he); Laurentius Medices (la); 洛伦佐·德·美第奇 (wuu); Lorenzo de’ Medici (fi); Lorenzo I de' Medici (nl); Lorenzo de' Medici (en-ca); 洛伦佐·德·美第奇 (zh-hans); 羅倫佐·德·麥地奇 (zh-tw); Lorenzo de' Medici (it); Lorenzo de' Medici (ga); Lorenzo de' Medici (vls); Лоренцо де Медичи (mk); Lorenzo de' Medici (et); Lorenco Mediči (sr-el); ਲੋਰੈਂਜ਼ੋ ਦੇ ਮੇਦੀਚੀ (pa); Lorenzo de' Medici (sv); Лярэнца Мэдычы (be-tarask); Լորենցո Մեդիչի (hy); Lorenzu dî Medici (scn); Lourenço de Médici (pt); Lorenzo de' Medici (mt); Wawrzyniec Wspaniały (pl); โลเรนโซ เด เมดีชี (th); Лоренцо Медичи (sr-ec); Lorenzo de' Medici Veličastni (sl); Lorenzo de' Medici (tl); Lorenzo de' Medici (id); Лоренцо Великолепный (ru); Lorenzo de' Medici (war); Lorenzo de' Medici (sw); Lorenzo de' Medici (ro); Lorenzo de' Medici (sh); Lorenzo de' Medici (sco); Lorenzo il Magnifico (de-ch); Lorenzo de' Medici (pms); Lorenzo de' Medici (ee); Lourenzo de Medici (gl); Lorenzo de' Medici (sq); Λαυρέντιος ο Μεγαλοπρεπής (el); Lorenzo de' Medici (vec) estadista y gobernante italiano (es); флорентийский государственный деятель, глава Флорентийской республики (1469-1492), поэт (ru); italienischer Politiker und Stadtherr von Florenz (de); polaiteoir agus daonnachtaí Iodálach (ga); италијански политичар и хуманиста (sr-ec); политик и хуманст от 15 век, владетел на Флоренция (bg); italiensk politiker, skribent og poet (1449-1492) (da); İtalyan hümanist ve siyasetçi (1449-1492) (tr); florentinsk statsman och poet (sv); правитель Флоренції між 1469 та 1492 роками (uk); italialainen poliitikko (fi); vládce Florencie, mecenáš a humanista (cs); politico e umanista italiano, signore di Firenze (de facto) dal 1469 al 1492 (it); homme politique et humaniste italien (1449-1492) (fr); ލިޔުންތެރިއެއް (dv); फिरेंझेमधील राजकारणी आणि सावकार (mr); o Magnífico (pt); statista Taljan u mexxej de facto tar-Repubblika ta’ Firenze (1449-1492) (mt); itāļu valstsvīrs, baņķieris, de facto Florences republikas valdnieks (lv); италијански политичар и хуманиста (sr); estadista italiano e gobernante de facto da república de Florencia, mecenas das artes, diplomático, banqueiro, poeta e filósofo renacentista, pertencente á familia dos Medici (gl); מנהיגה של פירנצה במחצית השנייה של המאה ה-15 (he); Signor Florencji z dynastii Medyceuszy (pl); italiensk politiker, skribent og poet (nb); Italiaans politicus (1449–1492) (nl); italiensk politikar, skribent og poet (nn); neoficiálny vládca Florencie (sk); estadista i governant italià (ca); سیاستمدار، نویسنده، و شاعر ایتالیایی (fa); Italian politician and humanist (en); حاكم منطقة فلورنسا الإيطالية بالعصور الوسطى (ar); politician italian (ro); 이탈리아의 정치가 (1449–1492) (ko) Lorenzo el Magnífico, Lorenzo el Magnifico de Medici, Lorenzo de Médicis, Lorenzo de Medicis, Lorenzo de' Medici, Lorenzo el Magnifico, Lorenzo el Magnífico de Medici, Lorenzo de Medici (es); Lorenzo de' Medici (eu); Llorenç de Mèdici, Lorenzo il Magnífico, Llorenç el Magnífic, Lorenzo de Medici (ca); Лоренцо Медичи, Лоренцо де Медичи (ba); Lorenzo de' Medici, Lorenzo I. de' Medici, Lorenzo de Medici, Lorenzo il Magnifico, Lorenzo der Prächtige, Lorenzo di Piero de' Medici (de); Ларэнца Цудоўны (be); Лоренцо Величанствени (sr-ec); 洛伦佐一世·德·梅第奇, 洛伦佐·德美第奇, 洛伦佐一世·德·美第奇, 洛伦佐·德·梅第奇, Lorenzo de' Medici, 洛伦佐·美第奇 (zh); Lorenzo de Medici (da); Lorenzo de Medici (ro); ロレンツォ・イル・マニフィコ, ロレンツォ1世・デ・メディチ (ja); Lorenzo Medici, Lorenzo di Piero de’ Medici, Lorenzo de’ Medici, Lorenzo de Medici (sk); לורנצו די מדיצ'י, לורנצו המפואר, לורנצו מדיצ'י (he); Laurentius de' Medici, Laurentius de Medici, Laurentius Magnificus (la); 로렌초 데메디치, 로렌초 메디치 (ko); Lorenzo de la Mediĉoj, Lorenzo De Medici, Lorenzo dei Medici, Lorenzo de' Medici (eo); Lorenzo Magnifico, Lorenzo il Magnifico, Lorenzo I. Nádherný, Lorenzo Medici, Lorenzo Medicejský, Lorenzo de' Medici, Lorenzo De' Medici, Medicejský LorenzoI., il Magnifico Lorenzo, le Magnifique Laurent (cs); Lorenzo I de' Medici, Lorenzo dei Medici, Lorenzo il Magnifico, Lorenzo di Piero de' Medici (it); Médicéo-Laurentine, Laurent Ier de Médicis, Laurent le Magnifique, Lorenzo il Magnifico, Laurent de Medicis, Lorenzo de' Medici (fr); Lorenzo Tore, Lorenzo I de' Medici, Lorenzo il Magnifico, Lorenzo I, Lorenzo di Piero de' Medici, Lorenzo de Medici (et); लॉरेन्झो दि मेदिची, लॉरेंझो दि मेदिची, लॉरेंझो इल मॅग्निफिको (mr); Lorenzo II de' Medici, Lorenzu lu Magnificu, Lurenzu dî Mèdici (scn); Lourenço o Magnífico, Lorenzo de' medici, Lorenzo de medici, Lourenço, o Magnífico, Lorenzo de Médici, Lorenzo Medici (pt); Lorenzo il-Magnifico, Lorenzo l-Manjifiku (mt); Lorenzo il Magnifico, Lorenzo av Medici, Medici, Lorenzo de, Lorenzo de Medici (sv); Lorenzo de’ Medici, Lorenzo Medici (af); Лоренцо Величанствени (sr); Lorenzo Veličastni (sl); Lorenzo Iañ de' Medici (br); Lorenzo il Magnifico, Muhteşem Lorenzo (tr); Lorenzo the Magnificent, Lorenzo de'Medici, il Magnifico Lorenzo de'Medici, Lorenzo il Magnifico, Lorenzo de Medici, Lorenzo de’ Medici (en); Lorenzo il Magnifico, ลอเรนโซ ดิ โคสิโม เดอ เมดิชิ, Lorenzo the Magnificent, Lorenzo de' Medici, Lorenzo de Medici, Lorenzo de’ Medici (th); Wawrzyniec Medyceusz, Lorenzo Medici, Lorenzo de' Medici, Il Magnifico, Lorenzo de Medici (pl); Lorenzo il Magnifico, Lorenzo de Medici, Lorenzo de'Medici (nb); Lorenzo de' Medici, Lorenzo de Luisterrijke, Lorenzo de Prachtlievende, Lorenzo de Medici, Lorenzo Il Magnifico (nl); Lorenzo de' Medici, Lorenzo de Medici (fi); Лоренцо Медичи, Медичи Лоренцо де, Медичи Лоренцо Великолепный, Лоренцо Великолепный Медичи, Медичи, Лоренцо де, Медичи Лоренцо, Медичи Л., Лоренцо де Медичи, Лоренцо ди Медичи, Лоренцо де’Медичи, Медичи, Лоренцо (ru); Лоренцо Пишний, Лоренцо Медичі, Медичі Лоренцо (uk); Лоренцо Медичи, Лоренцо I Медичи, Лоренцо де Медичи (bg); Lourenzo o magnifico, Lourenzo di Piero de' Medici (gl); لورينزو الرائع (ar); Λαυρέντιος των Μεδίκων (el); لورنزو دو مدیچی, لورنزوی مدیچی (fa)
लॉरेंझो दे मेदिची
फिरेंझेमधील राजकारणी आणि सावकार
Retrato de Lorenzo de Médici obra del taller de Agnolo Bronzino (ca. 1569)
लॉरेंझोच्या मृत्यूनंतर फिरेंझेच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली.
लॉरेंझो दे मेदिचीचे आजोबा कोसिमो दे मेदिची हे त्यांच्या घराण्यातील फिरेंझेचे पहिले शासक होते. हे बांको दै मेदिची ही बँक चालवीत असत व त्याद्वारे ते युरोपमधील सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक झाले होते. त्याचवेळी त्यांनी फिरेंझेच्या राजकारणावर पकड बसवली. सत्तेवर असताना त्यांनी फिरेंझेच्या जनतेसाठीच्या सरकारी कामांवर आणि तेथे कलाप्रसार करण्यावर मुबलक पैसा खर्च केला.[६] लॉरेंझोचे वडील पिएरो दि कोसिमो दे मेदिची यांनीही अनेक कलांना आश्रय दिला तर त्याचे काका जियोव्हानी दि कोसिमो दे मेदिची यांनी परंपरागत व्यवसाय चालविला. लॉरेंझोची आई लुक्रेझिया तोर्नाबुओनी ही कवयत्री होती व फिरेंझेच्या प्लॅटोनिक अकादमीतील सदस्यांशी ती ओळख ठेवून होती.[७] लॉरेंझोच्या वडील आणि काकांच्या मृत्युपश्चात ती लॉरेंझोची मुख्य सल्लागार झाली.
पिएरो आणि लुक्रेझियाच्या पाच मुलांपैकी लॉरेंझो हा सगळ्यात कर्तबगार समजला जात होता. लहानपणी त्याला जेंतिले दे बेक्की या राजदूत आणि बिशपने तसेच मार्सिलियो फिचिनो या तत्त्वज्ञानने शिक्षण दिले.[८] त्याला रिनैसाँ काळातील महत्त्वाचे विद्वान जॉन आर्गिरोपूलस यांच्याकडून ग्रीक भाषा आणि संस्कृतीचे शिक्षण मिळाले.[९] याशिवाय लॉरेंझो आणि त्याचा भाऊ जुलियानो यांनी जाउस्टिंग, शिकार करणे, शिकारी पक्षी बाळगणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या २०व्या वर्षी त्याने पालियो दि सियेना या घोड्यांच्या शर्यतीत भाग घेतल आणि तेथे जाउस्टिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[१०][११] याबद्दल लुइजी पुल्चीने कविता लिहून ठेवली आहे.[१२] ही स्पर्धा मेदिची कुटुंबाने प्रायोजित केली होती याची नोंद घेत निक्कोलो माकियाव्हेलीने (कदाचित उपरोधानो) लिहिले की लॉरेंझो वशिल्याने नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्त्वेने ही स्पर्धा जिंकला.[१३]
लॉरेंझोला त्याच्या वडीलांनी लहानपणीच अनेक राजनैतिक दूत म्हणून महत्वाच्या व्यक्तींना भेटण्यास पाठविले. लॉरेंझो यासाठी अनेक वेळा रोमला जाउन पोप आणि इतर राजकारण्यांना भेटला.[१४]
लोरेंझोचे वर्णन अगदी साधारण दिसणारा, फार उंच नसलेला, नकट्या नाकाचा, आखूड पायांचा आणि आडव्या बांध्याचा माणूस असे केल गेलेले आहे. लॉरेंझोला दूरवरचे दिसत नसे आणि त्याचा आवाज खरखरीत असल्याची नोंद आहे. उलटपक्षी त्याचा भाऊ जुलियानो हा अतिशय देखणा होता. बॉतिचेल्लीने आपले मार्स अँड व्हीनस हे चित्र काढताना जुलियानोला समोर ठेवलेले होते.[१५] लॉरेंझोच्या अगदी खास मित्र निक्कोलो व्हालोरीने सुद्धा लॉरेंझोचे वर्णन करताना तो दिसायला कुरूप परंतु कुशाग्र बुद्धी असलेला, ज्याच्याकडे पाहताच त्याच्याबद्दल आदर वाटण्यासारखे काहीही नसलेला असे केले आहे.[१६]
राजकारण
लहानपणापासून घराण्याचा वारसा चालविण्यासाठी तयार केल्या गेलेल्या लॉरेंझोने १४६९मध्ये आपल्या आजोबा आणि वडीलांच्या मृत्यूनंतर बांको दै मेदिची आणि फिरेंझेच्या राजकारणाचे सुकाणू हाती घेतले. यावेळी तो २० वर्षांचा होता. कोसिमो आणि पिएरोने फिरेंझेच्या जनतेसाठी आणि इतर राजकारणातील खर्चासाठी बँकेतून पैसे उचलले होते. हे लॉरेंझोने आपल्या सत्ताकाळात परत मिळवले.[१७]
लॉरेंझोने फिरेंझे आणि फिरेंझेच्या प्रजासत्ताकावर कधीच थेट सत्ता चालवली नाही. आपल्या आजोबा, वडील व नंतर मुलाप्रमाणेच त्याने आपले हस्तक सत्तेवर बसवले आणि पैसे चारून आणि नेमके हुनरी, कर्तबगार लोकांशी लग्नसंबंध करून त्याने सत्तेवर थेट १४९० पर्यंत मजबूत पकड ठेवली होती.[१८][१९] या कारणास्तव फिरेंझेमधील इतर महत्त्वाकांक्षी कुटुंबे मेदिचींना पाण्यात पहात असे. यांच्या विरोधामुळे प्रजासत्ताकाचे राजकारण ढवळून निघाले ते लॉरेंझोच्या मृत्यूनंतरही तसेच राहिले. यांपैकी पाझी कुटुंबाचा मेदिचींवर विशेष रोष होता व त्यांनी रचलेल्या कटात मेदिचींची सत्ता संपुष्टात येता राहिली.[१८][२०]
या कटाविरुद्ध झालेल्या जनक्षोभात आपले हस्तक बळी पडलेले पाहून आणि फिरेंझेवर आपली हुकुमत येणे अशक्य असल्याचे कळून चुकल्यावर सिक्स्टस चौथ्याने मेदिची घराण्याची संपत्ती मिळेल तेथून जप्त केली आणि फिरेंझेच्या प्रजासत्ताकावर अनेक प्रकारे अडचणी आणल्या. त्याने लॉरेंझोला आणि पर्यायाने फिरेंझेच्या सरकारला वाळीत टाकले आणि नंतर संपूर्ण प्रजासत्ताकावर धार्मिक संस्कार करण्यावर बंदी घातली.[२४] याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे पाहून त्याने नेपल्सच्या राजापहिल्या फर्डिनांडशी युती केली आणि फर्डिनांडचा मुलगा कालाब्रियाचा आल्फोन्सोच्या नेतृत्त्वाखाली फिरेंझेवर चाल केली.[२५]
याविरुद्ध लॉरेंझोने फिरेंझेच्या नागरिकांना आवाहन करून प्रतिकार केला परंतु फिरेंझेचे परंपरागत मित्र-राज्ये बोलोन्या आणि मिलानकडून मदत न मिळाल्याने हे युद्ध लांबत गेले.[२०] ही कोंडी फोडण्यासाठी लॉरेंझो स्वतः नेपल्सला फर्डिनांडशी बोलणी करण्यासाठी गेला आणि स्वखुशीने त्याचा बंदी म्हणून अनेक महिने राहिला. फर्डिनांडशी तह करून लॉरेंझोने फिरेंझेवरील संकट घालवले. याचा फायदा करून घेत त्याने फिरेंझेच्या संविधानात अनेक बदल करवून घेतले व त्याद्वारे फिरेंझेवरील स्वतःची पकड अधिकच मजबूत केली
यानंतर लॉरेंझोने आसपासच्या राज्यांशी मित्रत्त्वाचे धोरण घेतले. आपल्या आजोबा कोसिमो दे मेदिचीप्रमाणे याने उत्तर इटलीमधील राज्यांमध्ये मुत्सद्दीपणा करून त्यांच्या आपसात शांतता राखली आणि त्याद्वारे युरोपातील फ्रांस आणि व्हॅटिकन सिटी यांसारख्या मोठ्या सत्तांना इटलीपासून दूर ठेवले. लॉरेंझोने ऊस्मानी सम्राटमेहमेद दुसऱ्याशीही मित्रत्त्वाचे संबंध स्थापले. ऊस्मानी साम्राज्याशी समुद्रीमार्गी होत असलेल्या व्यापारातून मेदिची घराण्याच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली.[२६]
या शांतताकाळात लॉरेंझोने मेदिची घराण्याचा व फिरेंझेचा आर्थिक विकास करणे चालू ठेवले होते. या सुमारास तोस्कानामधील व्होल्तेरा येथे मोठ्या प्रमाणात तुरटी आढळू आली. काच बनविणे, कातडे कमविणे आणि वस्त्रोद्योगात वापरले जाणारे हे खनिज तोपर्यंत फक्त उस्मानी साम्राज्यातून, ते ही जिनोआच्या एकाधिकाराखाली आयात होत असे. १४६२मध्ये व्हॅटिकन सिटी आणि नंतर लॉरेंझोच्या मेदिची बँकेने यात शिरकाव केला. व्हॅटिकनमधून पोपने अधर्मीयांकडून (मुसलमान उस्मानी साम्राज्य) तुरटी आयात करण्यावर बंदी घातली. त्यामुळे तोल्फा आणि व्होल्तेरामधील तुरटीला मोठा भाव मिळाला.[२७] या बदल्यात पोपने प्रति क्विंटल २ डुकाट कर घेणे सुरू केले. व्होल्तेराच्या नागरिकांना जेव्हा आपल्या प्रदेशातील तुरटीची किंमत कळली तेव्हा त्यांनी त्यातून मिळणारा पैसा फिरेंझेतील सावकार आणि रोममधील पोपकडे न जाता आपल्याच शहरात खर्च व्हावा अशी मागणी केली. फिरेंझेनी ही मागणी धुडकावून लावल्यावर व्होल्तेराने फिरेंझेपासून विभक्त होण्याचा प्रयत्न केला. या सशस्त्र उठावाविरुद्ध लॉरेंझोने भाडोत्री सैन्य धाडले. या सैन्याने व्होल्तेरामध्ये जाळपोळ केली आणि तेथील अनेक नागरिकांना मृत्युदंड दिला. लॉरेंझोने यानंतर व्होल्तेराला जाउन समझोता केला परंतु ही बाब त्याच्या व्यावसायिक आणि राजकारणी व्यक्तमत्वावरील गालबोट ठरले.[२८][२९]
कलाश्रय
लॉरेंझोने आपल्या दरबारात व मित्रवर्तुळात अनेक चित्रकार, शिल्पकार, लेखक, कवी आणि इतर कलाकारांना आश्रय दिला होता. ख्यातनाम होण्याआधीच लॉरेंझोने त्यांचे हुनर ओळखून त्यांना आर्थिक आणि इतर अनेक प्रकारे मदत केली. यांपैकी लिओनार्दो दा विंची, मिकेलेंजेलो बुओनारोती, पिएरो देल पोलैओलो, अँतोनियो देल पोलैओलो, आंद्रेआ देल व्हेरोक्कियो, सांद्रो बॉत्तिचेल्ली, दॉमेनिको घिर्लांदैयो या दिग्गजांनी इटली आणि पर्यायाने युरोपातील कलाक्षेत्रात क्रांती केली. युरोपातील रिनैसाँ घडवून आणणाऱ्या या मंडळींचा पुढील अनेक शतके जगभर प्रभाव आहे. त्यांच्यामागे खंबीरपणे उभा असलेल्या लॉरेंझोमुळे जगप्रसिद्ध कलाकृती तयार झाल्या. यांत मिकेलेंजेलोचा डेव्हिड, लिओनार्दोची अनेक चित्रे, रफायेलची कला, यांशिवाय असंख्य कृतींचा समावेश आहे. मिकेलेंजेलो तर तीन वर्षे लॉरेंझोच्या महालात त्याच्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्यासारखा राहिला होता.
लॉरेंझोने स्वतः या कलाकारांकडून मोजक्याच कृती बनवून घेतल्या असल्या तरी आपले राजकीय आणि व्यावसायिक संबंध वापरून त्याने यांना अनेक धनाढ्य आणि शक्तिशाली लोकांकडून कामे मिळवून दिली.
लॉरेंझो स्वतः चित्रकार होता आणि त्याने आपल्या तोस्काना बोलीभाषेत कविता केल्या आहेत. यांत त्याने मानवी जीवनातील आनंदाबरोबरच दुःख, विषाद आणि अस्थिरता यांचे वर्णन केले आहे. विशेषतः त्याच्या आयुष्यातील उत्तरकाळातील कृतींमध्ये हे अधिक दिसून येते.[३०]
लॉरेंझोचे आजोबा कोसिमो यांनी पुस्तके गोळा करणे सुरू केले होते. यातून पुढे मेदिची ग्रंथालय (लॉरेंशियन ग्रंथालय) तयार झाले. लॉरेंझोने आपल्या हस्तकांकरवी पूर्वेतून अनेक दुर्मिळ पुस्तके आणवली. अशा पुस्तकांच्या असंख्य नकला करण्यासाठी त्याने कारागीर बसविले व या ज्ञानाचा युरोपभर प्रसार करविला. त्याने मार्सिलियो फिचिनो, पोलिझियानो आणि जियोव्हानी पिको देल्ला मिरांदोला यांसारख्या अनेक विचारवंतांच्या बैठका घडवून आणि त्यातून तयार झालेले तत्त्वज्ञान जतन करवून ठेवले.[३१]
दूरदर्शीपणाने आणि उदारहस्ताने मदत करून युरोपभर कला आणि ज्ञान पसरविल्यामुळे लॉरेंझोला महान (इल मॅग्निफिको) हे बिरुद मिळाले.
लॉरेंझोने आपल्याकडील कलाश्रितांना इतर राज्यकर्त्यांकडे पाठवून राजनैतिक संबंध दृढ केले. त्याने घिर्लांदैयो, बॉत्तिचेल्ली, पिएत्रो पेरुजिनो, कोसिमो रॉसेल्ली यांसारख्यांना सिस्टीन चॅपेलमधील भित्तिचित्रे रंगवण्यास स्वखर्चाने पाठविले. यामुळे पोप सिक्स्टस चौथा आणि फिरेंझेमधील वितुष्ट कमी होण्यास मदत झाली.[३१]
लॉरेंझोने १४७१मध्ये लावलेल्या अंदाजानुसार मेदिची घराण्याने कलाश्रयावर तोपर्यंत ६,३०,००० फ्लोरिन (२०२०मधील ३,८४० कोटी रुपये) खर्च केले होते. ही रक्कम पुढील २० वर्षे लॉरेंझो हयात असेपर्यंत अनेकपटींनी वाढली असल्याचा कयास आहे. याबद्दल लॉरेंझोने म्हणले आहे --
या (कला व ज्ञानप्रसारावर पैसे खर्च करणे) बद्दल मला किंचितही खेद नाही. अनेकांना या मोठ्या रकमेतील काही भाग तरी आपल्या खिशातच रहावा असे वाटत असले तरीही. माझे असे मत आहे हा खर्च करणे हे आपल्या राज्याचा बहुमान आहे, आणि मला वाटते की हा पैसा योग्य ठिकाणीच खर्च झाला आणि याचा मला अत्यंत आनंद आहे.[३२]
१४७९मध्ये लॉरेंझो फिरेंझेच्या सिन्योरियाची पुनर्बांधणी करणाऱ्या समितीचा कायमी सदस्य झाला. या पदावरून त्याने सार्वजनिक कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कलाकृतींच्या निवडीत मोठा प्रभाव ठेवला.[३३]
कुटुंब
लॉरेंझो दे मेदिचीने क्लॅरिचे ओर्सिनीशी ७ फेब्रुवारी, १४६९ रोजी लग्न केले. नंतर ४ जून रोजी त्यांनी पुन्हा समक्ष लग्न केले. हे दोघेही समवयस्क होते जे त्याकाळच्या इटालियन समाजात नवलाईचे होते. त्यांचे लग्न क्लॅरिचेच्या मृत्यूपर्यंत टिकले.[३४] क्लॅरिचे ओर्सिनी घराण्याच्यायाकोपो आणि माद्दालेना ओर्सिनी यांची मुलगी होती.
लॉरेंझोच्या शेवटच्या वर्षांमध्येही तो राजकारण आणि व्यवसायात व्यस्त होता. त्याची ७ पैकी अनेक मुले स्वतः वेगवेगळ्या मार्गी लागलेली होती. त्याचा सगळ्यात मोठा मुलगा पिएरो वडीलांच्या मागे फिरेंझेचे शासन सांभाळण्यासाठी सज्ज होत होता. एका मुलीने पोप इनोसंट आठव्याच्या मुलाशी लग्न केलेले होते. ४ मुले कार्डिनल झाली व त्यांतील २ पुढे जाउन पोपपदी बसली होती.
लॉरेंझोची पत्नी क्लॅरिचे मृत्युशय्येवर असताना तो स्वतः खूप आजारी होता व तिच्या शेवटच्या दिवसांत तिच्यापासून लांब होता. तिच्या मृत्यूनंतर त्याने खच खाल्ली व त्याने हळूहळू राजकारण आणि व्यवसायातून अंग काढून घेण्यास सुरुवात केली.
याच सुमारास फिरेंझेच्या लोकांवर गिरोलामो साव्होनारोला या धर्मगुरुचा प्रभाव वाढला होता. त्याच्या मते ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्मापासून दूर जात होते व त्याकरता लॉरेंझो आणि त्याने आश्रय दिलेले कलावंत मोठ्या प्रमाणात जबाबदार होते. साव्होनारोला याला खुद्द लॉरेंझोनेच फिरेंझेला आणवला होता.[३९]
लॉरेंझोच्या मृत्युपश्चातच्या निष्कर्षांनुसार त्याला अॅक्रोमेगाली हा दुर्मिळ आजार होता. त्याच्या वर्णनावरून आणि त्याच्या अस्थि आणि मृत्युमुखवट्यावरील संशोधनावरून हे निष्कर्ष काढलेले आहेत.[४०]
लॉरेंझो ८ एप्रिल, १४९२ च्या रात्री आपल्या करेज्जी येथील महालात मृत्यू पावला.[४१] तो मृत्युशय्येवर असताना साव्होनारोला त्याला भेटायला गेला होता. त्यानंतर अफवा होती की साव्होनारोलाने लॉरेंझोला मरताना नरकात जाण्याचा शाप दिला होता. परंतु रोबेर्तो रिदोल्फीच्याव्हिता दि गिरोलामो साव्होनारोला या पुस्तकानुसार हे खरे नाही. लॉरेंझोच्या मृत्यूच्या वेळी हजर असलेल्या व्यक्तींनी लिहिल्यानुसार लॉरेंझोने ८ एप्रिलचे धार्मिक संगीत ऐकले व त्यानंतर तो रात्रीत मृत्यू पावला.[४२] त्याच्या मृत्यूच्या क्षणी अनेक अपशकुन झाल्याचे सांगितले जाते, जसे कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरेच्या घुमटावर वीज कोसळणे, अनेक ठिकाणी भूत दिसणे, इ.[४३]
लॉरेंझोच्या मृत्यूनंतर पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची (कमनिशिबी पिएरो) या त्याच्या सर्वात मोठ्या मुलाने फिरेंझेची सत्ता आणि व्यवसाय हाती घेतला. दोनच वर्षांत दोन्ही गोष्टी त्याच्या हातातून गेल्या. लॉरेंझोचा दुसरा मुलगा जियोव्हानी लिओ दहावा नावाने पोप झाला व त्याने स्पेनच्या राजाशी संधान बांधून १५१२मध्ये फिरेंझे काबीज केले.[४५] लॉरेंझोचा दत्तक मुलगा जुलियो दि जुलियानो हा क्लेमेंट सातवा नावाने पोप झाला आणि त्याने अलेस्सांद्रो दे मेदिचीच्या हाती फिरेंझेची सत्ता देउन आपल्या घराण्याची फिरेंझेच्या प्रजासत्ताकावरील पकड पुन्हा मिळवली.[४६]
संदर्भ आणि नोंदी
^केंट, एफ.डब्ल्यू. लॉरेंझो दे मेदिची अँड द आर्ट ऑफ मॅग्निफिसन्स (इंग्लिश). अमेरिका. p. 248.
^Janet Ross. "Florentine Palaces & Their Stories". 14 August 2016. Page 250.
^वॉल्टर, इंगेबोर्ग (२०१३). "लॉरेंझो डेर प्राख्टिगे:माझेन, श्योंगाइस्ट उंड टिरान" [लॉरेंझो द मॅग्निफिसंट: पेट्रन, अॅस्थेट अँड टायरंट]. दमाल्स (जर्मन भाषेत). Vol. ४५ no. ३. p. ३२.
^ abराइनहार्ट, फोल्कर (२०१३). "Die langsame Aushöhlung der Republik" [द शो अँड स्टेडी एरोझन ऑफ द रिपब्लिक]. दमाल्स (जर्मन भाषेत). Vol. ४५ no. ३. pp. १६-२३.
^ग्विक्क्यार्दिनी, फ्रांचेस्को (१९६४). हिस्टरी ऑफ इटली अँड हिस्टरी ऑफ फ्लोरेन्स. न्यू यॉर्क: ट्वेन पब्लिशर्स. p. ८.