क्लॅरिचे ओर्सिनी (१४५३ – १४८८) ही मध्ययुगीन इटलीमधील एक खानदानी स्त्री होती. हे फिरेंझेच्या शासक लॉरेंझो इल मॅग्निफिकोची पत्नी होती व माद्दालेना आणि याकोपो ओर्सिनी यांची मुलगी होती.
क्लॅरिचे आणि लॉरेंझे यांचे लग्न ४-८ जून, १४६९ असे चार दिवसांत झाले हे लग्न लॉरेंझोच्या आई लुक्रेझिया तोर्नाबुओनीने आपल्या मुलाचा व मेदिची कुटुंबाचा सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी जुळवले होते. लग्नाच्यावेळी लॉरेंझो आणि क्लॅरिचे साधारण एकाच वयाचे होते. तत्कालीन इटलीत हे नवल होते. क्लॅरिचेचा हुंडा 6,000 फ्लोरिन होता.
लग्नानंतर लॉरेंझोने तिचा रिनाल्दोला फिरेंझेचा आर्चबिशप पदावर निवडून येण्यात मदत केली होती. फिरेंझेचे नागरिक आपली गाऱ्हाणी घेउन तिच्याकडे येत असत तिने आपले स्वतःचे हेरवजा ओळखींचे जाळे रचले होते. त्याद्वारे ती सैन्याच्या हालचाली आणि लढायांसह दूरवरच्या राजकीय आणि लष्करी घटनांबद्दल माहिती गोळा करीत असे.
क्लॅरिचे ३० जुलै, १४८८ रोजी फिरेंझेमध्ये मृत्यू पावली. त्यावेळी लॉरेंझो तिच्या जवळ नव्हता. तो स्वतः खूप आजारी असल्याने सिएनाजवळ होता. तो अंत्यसंस्कारालाही येऊ शकला नाही.
पोप इनोसंट आठव्याला लिहिलेल्या पत्रात लॉरेंझो दिवंगत पत्नीची खूप आठवण येते.
अपत्ये
क्लॅरिचे आणि लॉरेंझो यांना दहा मुले झाली:
संदर्भ