जेनोवा (इटालियन: Genova) ही इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशाची राजधानी व देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लिगुरियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले व सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले गेनोवा हे इटलीमधील सर्वात मोठे बंदर व युरोपातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या शहरांपैकी एक आहे.
क्रिस्तोफर कोलंबसचे जन्मस्थान असलेल्या जेनोवामध्ये अनेक ऐतिहासिक इमारती व वास्तू आहेत ज्यांसाठी त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत २००६ साली स्थान मिळाले. जेनोवाच्या कला व संस्कृतीला मान देण्यासाठी २००४ साली हे शहर युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवडले गेले.
खेळ
फुटबॉल हा जेनोवामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून सेरी आमध्ये खेळणारे जेनोवा सी.एफ.सी. व यू.सी. संपदोरिया हे दोन क्लब येथेच स्थित आहेत.
प्रसिद्ध व्यक्ती
जुळी शहरे
खालील शहरे जेनोवाची जुळी आहेत:[१]
संदर्भ
- ^ [१], Comune di Genova - International
बाह्य दुवे
रात्रीच्या वेळी जेनोवाचे दृष्य