आर्जेन्टिना राष्ट्रीय फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Argentina) हा आर्जेन्टिना देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आर्जेन्टिनाने आजवर चार वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. ह्यांपैकी १९७८ आणि १९८६ साली आर्जेन्टिनाने अजिंक्यपद मिळवले. १९८६ च्या स्पर्धेमध्ये आर्जेन्टिनाचे नेतृत्व दिएगो मारादोनाने केले होते. कोपा आमेरिका ह्या दक्षिण अमेरिकेमधील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये आर्जेन्टिनाला प्रचंड यश मिळाले असून ही स्पर्धा त्यांनी १४ वेळा जिंकली आहे. आर्जेन्टिना जगामधील सर्वात बलाढ्य व लोकप्रिय संघांपैकी एक मानला जातो.