ॲंजेलिक कर्बर (जर्मन: Angelique Kerber; १८ जानेवारी १९८८) ही एक व्यावसायिक जर्मन टेनिसपटू आहे. २००३ पासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेली कर्बर २०११ साली यू.एस. ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून प्रसिद्धीझोतात आली. तिने २०१६ साली चारपैकी तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठण्याचा पराक्रम केला ज्यापैकी तिने २ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. तसेच १२ सप्टेंबर २०१६ रोजी तिने डब्ल्यू.टी.ए. एकेरी क्र्मवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले. २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत कर्बरने एकेरीचे रौप्यपदक देखील पटकावले. २०१६ मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पहिल्यांदाच जिंकले. [ संदर्भ हवा ]
ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या
एकेरी: ३ (२ - १)
बाह्य दुवे