ब्रेमन (जर्मन: Bremen) हे जर्मनी देशाच्या ब्रेमन ह्या राज्याच्या दोन शहरांपैकी एक आहे (दुसरे शहर: ब्रेमरहाफेन). हान्से संघामधील हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात वेसर नदीच्या काठावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. नीडरजाक्सन राज्याने ब्रेमनला सर्व बाजूंनी वेढले आहे.
२०१२ साली ब्रेमन शहराची लोकसंख्या सुमारे ५.५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २४ लाख होती. ब्रेमन हे उत्तर जर्मनीमधील हांबुर्ग खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. महाराष्ट्रातील पुणे हे ब्रेमेनचे भगिनी शहर आहे