२००८ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२८वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट २५ ते सप्टेंबर ८ २००८ दरम्यान दरवर्षीप्रमाणे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.
निकाल
पुरूष एकेरी
रॉजर फेडररने अँडी मरेला 6–2, 7–5, 6–2 असे हरवले.
महिला एकेरी
सेरेना विल्यम्सने येलेना यांकोविचला 6–4, 7–5 असे हरवले.
पुरूष दुहेरी
बॉब ब्रायन / माइक ब्रायननी लुकास लूही / लिअँडर पेसना 7–6(5), 7–6(10) असे हरवले.
महिला दुहेरी
कारा ब्लॅक / लीझेल ह्युबरनी समांथा स्टोसर / लिसा रेमंडना 6–3, 7–6(6) असे हरवले.
मिश्र दुहेरी
कारा ब्लॅक / लिअँडर पेसनी लीझेल ह्युबर / जेमी मरेना 7–6(6), 6–4 असे हरवले.
हे सुद्धा पहा