१९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ५ जून २००६ रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रो हे दोन देश वेगळे झाले.
१७ फेब्रुवारी २००८ रोजी कोसोव्हो ह्या प्रांताने सर्बियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली. सर्बियाने अद्याप स्वतंत्र कोसोव्होला मान्यता दिलेली नाही व कोसोव्हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा दावा केला आहे.
सर्बिया देशामध्ये एकूण २९ जिल्हे आहेत व व्हॉयव्होडिना व कोसोव्हो हे दोन स्वायत्त प्रांत आहेत. २००८ सालापासून कोसोव्हो प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!