वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये दोन कसोटी , ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[ १] [ २] [ ३] [ ४] दौऱ्यापुर्वी, बडोद्यात दोन दिवसीय सराव सामना होईल.[ ५]
ठरावाप्रमाणे एक एकदिवसीय सामना तिरुवनंतपुरमधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असे बीसीसीआयच्या दौरा आणि वेळापत्रक मंडळाने निश्चित केले.[ ६] परंतु जेव्हा मार्च २०१८मध्ये वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा संबंधीत सामना कोचीतील जवाहरलाल नेहरू मैदान येथे स्थानांतरित करण्यात आला.[ ६] केरळ क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला निर्णयावर पुनः विचार करण्याची विनंती केली.[ ६] सरतेशेवटी दोन दिवसांनी सामना तिरुवनंतपुरमलाच होईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले.[ ७] लखनऊतील एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाईल.[ ८] त्याच महिन्यात बीसीसीआयच्या सुत्रांकडून दुसरा एकदिवसीय सामना इंदूरमधून तिकिट विक्रीसंदर्भातील मतभेदामुळे हलवला जाणार असल्याचे कळले.[ ९] ३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदानावर होईल असे बीसीसीआयने जाहीर केले.[ १०] १२ ऑगस्ट २०१८ला बीसीसीआयने ४था एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवरून ब्रेबॉर्न स्टेडियमला हलवला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर तब्बल ९ वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना होईल. या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना भारत व श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना २ डिसेंबर २०१८ रोजी झाला .
जेसन होल्डर दुखापतीमुळे पहिली कसोटीला मुकला. त्याच्याजागी कर्णधारपदाची धुरा क्रेग ब्रेथवेटने सांभाळली.[ ११]
भारताच्या टी२० संघात महेंद्रसिंग धोनीऐवजी रिषभ पंतला घेण्यात आले.[ १२]
संघ
अल्झारी जोसेफला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी वेस्ट इंडीजच्या संघात शर्मन लुईसची निवड करण्यात आली.[ १६] भारताच्या एकदिवसीय संघातून शार्दुल ठाकूर बाहेर पडला तर त्याच्याजागी उमेश यादवला घेण्यात आले.[ १७] तसेच इव्हिन लुईसने वैयक्तिक कारणासाठी दौऱ्यातून माघार घेतली. त्याची जागा भरून काढण्यासाठी विंडिजच्या एकदिवसीय व ट्वेंटी२० संघात कीरन पॉवेल आणि निकोलस पूरनला घेण्यात आले.[ १८] शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमार , जसप्रीत बुमराह व केदार जाधव यांची निवड करण्यात आली तर मोहम्मद शमीला डच्चू देण्यात आला.[ १९] [ २०] आंद्रे रसेलला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडीजच्या ट्वेंटी२० संघात शई होपची निवड करण्यात आली.
सराव सामने
दोन-दिवसीय सराव सामना : बोर्ड अध्यक्षीय एकादश वि वेस्ट इंडीज
बोर्ड अध्यक्षीय एकादश
वि
नाणेफेक: बोर्ड अध्यक्षीय एकादश, फलंदाजी
कसोटी मालिका
१ली कसोटी
नाणेफेक: भारत, फलंदाजी.
पृथ्वी शाॅ (भा) आणि शर्मन लुईस (विं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
भारताच्या सचिन तेंडुलकरनंतर पृथ्वी शाॅ कसोटी शतक ठोकणारा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला, तर कसोटी पदार्पणातच शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला (१८ वर्षे आणि ३२९ दिवस).[ २१]
भारताच्या पहिल्या दिवशीतील ३६४ ह्या धावा वेस्ट इंडीजविरुद्ध एका दिवसात केलेल्या सर्वाधीक धावा.
विराट कोहलीच्या इ.स. २०१८मध्ये १००० कसोटी धावा पूर्ण तर भारताचा कर्णधार म्हणून त्याचे ३०वे आंतरराष्ट्रीय शतक.
रविंद्र जडेजाचे (भा) पहिले कसोटी शतक.
कुलदीप यादवचे (भा) कसोटीत प्रथमच पाच बळी.
भारताचा मायदेशातील १००वा कसोटी विजय तर एक डाव राखून मिळविलेल्या विजयाचा विचार करता हा सर्वात मोठा विजय.
२री कसोटी
नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
शार्दुल ठाकूर (भा) याने कसोटी पदार्पण केले.
रॉस्टन चेझचे (विं) चौथे कसोटी शतक.
उमेश यादवचे (भा) कसोटीत एका डावात प्रथमच ६ बळी तर एका कसोटीत पहिल्यांदाच १० बळी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
वि
भारत ३२६/२ (४२.१ षटके)
२रा सामना
भारत ३२१/६ (५० षटके)
वि
नाणेफेक : भारत, फलंदाजी
ओबेड मकॉय (विं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
विराट कोहली (भा) डावांच्या बाबतीत विचार करता सर्वात जलद १०००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला (२०५).
भारताचा ९५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आणि हा टप्पा गाठणारा जगातला पहिलाच संघ.
३रा सामना
नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
फॅबीयान अलेन (विं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
विराट कोहली (भा) एकदिवसीय सामन्यात सलग तीन शतके ठोकणारा कर्णधार म्हणून व भारताचा पहिला तर जगातला दहावा फलंदाज ठरला.
भारतामध्ये भारताचा पाठलाग करताना विराट कोहलीने शतक करून सुद्धा भारत सामना हरल्याची ही पहिलीच घटना.
४था सामना
भारत ३७७/५ (५० षटके)
वि
नाणेफेक : भारत, फलंदाजी.
भारताचा एकदिवसीय सामन्यातला तीसरा सर्वात मोठा विजय तर वेस्ट इंडीजचा भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठा पराभव.
५वा सामना
वि
भारत १०५/१ (१४.५ षटके)
नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
ह्या मैदानावरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना .
रोहित शर्मा (भा) एकदिवसीय सामन्यात २०० षटकार लगावणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला.
वेस्ट इंडीजची भारताविरुद्धची एकदिवसीय सामन्यातील निचांकी धावसंख्या.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ली ट्वेंटी२०
वि
भारत ११०/५ (१७.५ षटके)
२री ट्वेंटी२०
भारत १९५/२ (२० षटके)
वि
३री ट्वेंटी२०
नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
संदर्भ
सप्टेंबर २०१८ ऑक्टोबर २०१८ नोव्हेंबर २०१८ डिसेंबर २०१८ जानेवारी २०१९ फेब्रुवारी २०१९ मार्च २०१९ एप्रिल २०१९