वासुदेव वामन पाटणकर, अर्थात "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर (२९ डिसेंबर इ.स. १९०८- २० जून, इ.स. १९९७) हे मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी होते.
जीवन
वासुदेव वामन पाटणकर महाराष्ट्रातील यवतमाळ येथे वास्तव्य होते. ते पेशाने वकील होते.
इ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते हिच्याशी झाला [१]. उत्तरकाळी दृष्टिदोषामुळे कविता सुचल्यावर ते पत्नी इंदूताई यांना रचना ऐकवत व इंदूताई त्या कविता लिहून घेत [१].
उमेदीच्या काळात पाटणकरांना शिकारीचा शौक होता व सहा पट्टेरी वाघांना लोळवून शिकारी म्हणून त्यांनी नाव कमवले होते [२].
शायरी व कार्यक्रम
पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली [२].
रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्त दरवर्षी२९ डिसेंबरला गझलेमध्ये उत्तम योगदान देण्याऱ्याला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.[३]
भाऊसाहेब पाटणकर यांचे प्रकाशित साहित्य
पुस्तकाचे नाव |
प्रकाशनवर्ष (इ.स.) |
साहित्यप्रकार |
प्रकाशन
|
जिंदादिल |
|
|
|
दोस्तहो |
इ.स. २००५ |
काव्यसंग्रह |
अरुण प्रकाशन
|
मराठी मुशायरा |
|
|
|
मराठी शायरी |
|
|
|
मैफिल |
|
|
उत्कर्ष प्रकाशन
|
सत्कार
ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या रंगत संगत प्रतिष्ठानने भाऊसाहेब पाटणकर यांचे एकदा यवतमाळ येथे आणि एकदा पुण्यात भव्य सत्कार समारंभ घडवून आणले होते.
संदर्भ व नोंदी