प्रमोद आडकर

ॲडव्होकेट प्रमोद ज्ञानेश्वर आडकर हे वकील आहेत. हे सन १९९६ सालापासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि कायदेविषयक सल्लागार आहेत. सन १९९६, २०००, २००६, २०११ या चारही वर्षी झालेल्या निवडणुकांतून त्यांची कार्यवाहपदी नेमणूक झाली आहे.

आडकर प्रतिष्ठान आणि रंगत संगत प्रतिष्ठान यांच्यातर्फे अनेक पुरस्कार दिले जातात. २४-९-२०१३ रोजी आडकर फाउंडेशनचा धम्मक्रांती पुरस्कार माजी नगरसेवक विलास वाडेकर यांना प्रदान करण्यात आला.

कार्य

  • रंगत संगत प्रतिष्ठान - अध्यक्ष व संस्थापक - सांस्कृतिक नाटय कला विषयक उपक्रम करणाऱ्या संस्थेची स्थापना.
  • आडकर फाऊंडेशन - अध्यक्ष व संस्थापक - काही वेगळे उपक्रम सादर करण्यासाठी आडकर फाऊंडेशनची स्थापना.
  • सिग्नेट पब्लिकेशन्स - सल्लागार व कार्यालयीन व्यवस्थापक - हा मराठी पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय गेली १८ वर्षे यशस्वीरीत्या करीत आहेत. (आजपर्यंत २५०पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत).
  • शाहू मोडक प्रतिष्ठान या संस्थेच्या समितीवर सदस्य म्हणून काम पहातात.
  • नाटय चित्र कला अकादमी, पुणे या संस्थेचे कायदेशीर सल्लागार.
  • जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज या संस्थेचे कार्यकारणी सदस्य.
  • साहित्य समन्वय महासंघाचे कार्याध्यक्ष.
  • डी.एस. कुलकर्णी फाऊंडेशनचे विश्वस्त.
  • मराठीतले पहिले शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या 'जिंदादिल' या मराठी शेरोशायरीच्या कार्यक्रमाचे सादरीकरण.
  • २०१३ साली सासवड येथे झालेल्या ८७व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे आडकर हे ’निवडणूक अधिकारी’ होते.
  • प्रमोद आडकर हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे सदस्य आहेत. कोशाध्यक्षाच्या अनुपस्थितीत वार्षिक खर्चाचा ताळेबंद आणि अंदाजपत्रक मंजूर करण्याच्या अन्य सभासदांच्या कृतीला आक्षेप घेतल्याचे जाहीरपणे सांगितले आणि त्यामुळे परिषदेची बदनामी झाली, या आरोपावरून प्रमोद आडकर यांची परिषदेच्या सभासदपदावरून हकालपट्टी करण्यात आली. (२४ जुलै २०१६).

पुरस्कार आणि सन्मान

  • अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा समाजभूषण पुरस्कार (२०११)
  • नाट्यचित्र कला अकादमीचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
  • अहमदनगरच्या दीपा निसळ स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला गेलेला कै. सुधाकर निसळ स्मृती पुरस्कार
  • डॉ. मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विद्यापीठाचा आयोजन जीवनगौरव पुरस्कार
  • मानवता प्रतिष्ठानचा मानवता पुरस्कार
  • काव्य-शिल्प संस्थीचा काव्यमित्र पुरस्कार
  • नाट्यचित्र कला अकादमीचा आदर्श संयोजक पुरकार
  • बंधुता प्रतिष्ठान (पुणे) यांचा बंधुता पुरस्कार
  • अशोक विकास सोसायटीचा अशोकमित्र पुरस्कार
  • माई घाणेकर प्रतिष्ठानचा राष्ट्रगौरव पुरस्कार
  • डॉ. मधुसूदन घाणेकर विश्वहास्य विद्यापीठातर्फे हास्य विद्यावाचस्पती सन्मान
  • महाराष्ट्र साहित्य परिषदतर्फे सन्मान
  • पुणे महापालिकेतर्फे २००१ साली केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विशेष सन्मान
  • विशाखा या मासिकाच्या २००८ सालच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर अ‍ॅड. प्रमोद आडकर यांचे छायाचित्र होते. तसेच त्या अंकात आडकरांचा परिचय करून देणारा 'रंगतदार वाटेवरचा प्रवासी' हा विशेष लेख होता.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!