मुघल-ए-आझम (हिंदी: मुग़ल-ए आज़म ; उर्दू: مغلِ اعظم ; रोमन लिपी: Mughal-e-Azam) हा इ.स. १९६० साली चित्रपटगृहांत झळकलेला हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. के. आसिफ याने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यात पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमार व मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुघल इतिहासातील कथाविषयावर हा चित्रपट आधारलेला आहे. या भव्य चित्रपटाच्या निर्मितीसाठी ९ वर्षांचा अवधी, तर १.५ कोटी भारतीय रुपये खर्च लागला. या चित्रपटाने भारतात कमालीचे व्यावसायिक यश मिळवत सर्वाधिक उत्पन्नाचा विक्रम केला. हा विक्रम शोले या इ.स. १९७५ सालातल्या हिंदी चित्रपटाने तोडेपर्यंत अबाधित राहिला. मुघल-ए-आझम चित्रपटातील अनेक गाणी लोकप्रिय झाली होती.
बाह्य दुवे
|
---|
१९५४-१९६० | |
---|
१९६१-१९८० | |
---|
१९८१-२००० | |
---|
२००१ - २०२० | |
---|
२०२१- सद्द्य | |
---|