श्री ४२० हा १९५५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वतः राज कपूर व नर्गिस ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. १९५५ सालामधील सर्वात यशस्वी ठरलेल्या श्री ४२० मधील मुकेशने गायलेले मेरा जूता है जपानी हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.