मुकेश माथुर (जन्मदिनांक : २२ जुलै १९२३; मृत्यः २७ ऑगस्ट १९७६) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक होते. मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्ती रायचंद त्रिवेदी यांची कन्या सरला ही मुकेश यांची पत्नी होती. अठरा वर्षाच्या सरलाने पूजेसाठी देवळात जाण्याचे निमित्त काढले आणि देवळातून निघून थेट मुकेशबरोबर पळून जाऊन लग्न केले(२२-७-१९४६). मुकेश तेव्हा बेघर होते आणि तत्कालीन प्रसिद्ध नट मोतीलाल याच्याकडे रहात होते. लग्नाच्याच दिवशी मुकेशचा २२वा वाढदिवस होता. पुढे त्यांना ऋता (जन्मतारीख -२४-४-१९४८) ही कन्या आणि नितीन (जन्मतारीख - २७-६-१९५०) हा मुलगा झाला. मुलांच्या जन्मांनंतर मुकेशच्या कारकिर्दीला बहर आला आणि त्यांची भरपूर गाणी ध्वनिमुद्रित होऊ लागली.
मुकेशने गायलेली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीते (कंसात चित्रपटाचे नाव आणि संगीत दिग्दर्शक) पुढील प्रमाणे आहेत.
(अपूर्ण)