देवदास (bho); দেবদাস (bn); Devdas (fr); Devdas (filem 1955) (ms); देवदास (mr); Devdas (de); Девдас (ru); دوداس (fa); 《戴维达丝》 (zh); देवदास (new); Devdas (fi); デーヴダース (ja); Devdas (it); Devdas (en); Devdas (film 1955) (id); Devdas (pl); ദേവദാസ് (ml); Devdas (nl); देवदास (sa); देवदास (hi); దేవదాస్ (te); ਦੇਵਦਾਸ (pa); দেৱদাস (১৯৫৫ চলচ্চিত্ৰ) (as); Devdas (es); دیوداس (1955 فلم) (ur); தேவ்தாஸ் (ta) film del 1955 diretto da Bimal Roy (it); ১৯৫৫ চলচ্চিত্র (bn); film indien réalisé par Bimal Roy en 1955 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); film India oleh Bimal Roy (id); Film von Bimal Roy (1955) (de); film uit 1955 (nl); (१९५५) (sa); हिन्दी चलचित्र (१९५५) (hi); ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); película hindi (1955) (es); film (sq); हिंदी चित्रपट (१९५५) (mr); 1955 Hindi film directed by Bimal Roy (en); 1955 ஆம் ஆண்டு வெளிவந்த இந்தி மொழித் திரைப்படம் (ta)
देवदास हिंदी चित्रपट (१९५५) |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
प्रकार | चलचित्र |
---|
गट-प्रकार | - प्रणय चित्रपट
- नाट्य
- film based on literature
|
---|
मूळ देश | |
---|
संगीतकार | |
---|
पटकथा | |
---|
निर्माता | |
---|
वितरण | |
---|
वर आधारीत | |
---|
दिग्दर्शक | |
---|
प्रमुख कलाकार | |
---|
प्रकाशन तारीख | |
---|
कालावधी | |
---|
|
|
|
देवदास हा १९५५ सालचा बिमल रॉय दिग्दर्शित भारतीय चित्रपट असून शरत चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरी देवदासवर आधारित आहे.[१] या चित्रपटात दिलीप कुमार या मुख्य भूमिकेत आहे. वैजयंतीमाला ने चंद्रपुखी नावाची भूमिका केली होती, तर सुचित्रा सेनने तिच्या बॉलिवूड मधील या प्रथम चित्रपटात पार्वती म्हणून भूमिका केली होती. मोतीलाल, नाझीर हुसेन, मुराद, प्रतिमा देवी, इफ्तेखार आणि शिवराज इतर मुख्य भूमिकेत होते आणि जॉनी वॉकर आणि प्राण यांच्या लहान भूमिका होत्या.
२००५ मध्ये, इंडियाटाइम्स मूव्हीजने बॉलिवूड चित्रपटातील अव्वल २५ चित्रपटात याचे नाव नोंदवले.[२] कमल बोस यांच्या नेतृत्वात सिनेमॅटोग्राफी आणि प्रकाशयोजनेसाठीही या चित्रपटाची नोंद झाली आहे ज्याने दिलीप कुमारने साकारलेल्या भावनांच्या छटा वाढविल्या होत्या.[३]
निर्माण
देवदाससाठी दिग्दर्शक बिमल रॉय यांची दिलीप कुमार ही पहिली पसंती होती. तथापि, त्यांना पारोच्या रूपात मीना कुमारी आणि चंद्रमुखी म्हणून नर्गीस दत्त ह्या अभिनेत्री हव्या होत्या. पण, मीना कुमारी ही भूमिका करू शकली नाही कारण त्यांचे पती कमाल अमरोही यांनी काही अटी घातल्या ज्या बिमल रॉय यांना मान्य नव्हते. पारोची मुख्य भूमिका हवी असल्याने नर्गिसने चंद्रमुखीची भूमिका करण्यास नकार दिला. त्यानंतर बीना राय व सुरैय्या कडे संपर्क साधला गेला. पण यांनाही पारोचीच भूमिका हवी होती. काहीच पर्याय नसल्याने त्यांना नव्या उभरत्या अभिनेत्री वैजयंतीमालाला चंद्रमुखी म्हणून घ्यावे लागले.
सचिन देव बर्मन यांनी संगीत दिलेले दहा गाणे या चित्रपटात आहेत. ज्येष्ठ कवी व गीतकार साहिर लुधियानवी यांनी ती लिहिलेली आहे. काही गाणी बाउल परंपरेने प्रेरित झाली. याशिवाय चंद्रमुखीच्या पात्राची तवाइफ संस्कृती दर्शविण्याकरिता ठुमरी पण आहेत. तलत मेहमूद, लता मंगेशकर, मुबारक बेगम, मन्ना डे, गीता दत्त, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि उषा मंगेशकर या गायकांनी या गीतांना आपला आवाज दिला आहे.
पुरस्कार
३ऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने हिंदीतील तिसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र मिळवले.[४] हा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता (बिमल रॉय प्रॉडक्शन) यांना देण्यात आला आहे. तसेच ४थ्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने तीन पुरस्कार जिंकले: दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, मोतीलाला यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार आणि वैजयंतीमाला यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.[५]
[६] कार्लोवी व्हेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट झळकला होता.
संदर्भ
|
---|
१९५४-१९६० | |
---|
१९६१-१९८० | |
---|
१९८१-२००० | |
---|
२००१ - २०२० | |
---|
२०२१- सद्द्य | |
---|