मधुबाला

मधुबाला
जन्म मुमताज़ बेगम जेहन देहलवी
१४ फेब्रुवारी इ.स. १९३३
दिल्ली
मृत्यू २३ फेब्रुवारी इ.स. १९६९
बांद्रा, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
भाषा हिंदी
पती किशोर कुमार

आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम नहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला'असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते.

पुस्तके

मधुबालाची जीवनकथा सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांपैकी काही ही : -

  • अभिनेत्री मधुबाला (१९६९)
  • मधुबाला - चित्रपटसृष्टीतील महानायिका (डॉ. श्रीकांत मुंदरगी)
  • मधुबाला- दर्द का सफर (हिंदी, लेखिका - सुशीला कुमारी)
  • मधुबाला : मस्ती अँड मॅजिक (अल्पना चौधुरी)
  • मधुबाला (शशिकांत किणीकर)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!