दर चार वर्षांनी खेळवल्या जात असलेल्या फिफा विश्वचषकाच्या यजमान देशाची निवड फिफाच्या साधारण बैठकीमध्ये केली जाते. ह्यासाठी उत्सुक देशांना आपल्या निविदा सादर करणे बंधनकारक आहे. साधारणपणे विश्वचषक अमेरिका व युरोप ह्या दोन खंडांमध्ये आलटून-पालटून खेळवला जातो. आजवर आशियामध्ये एकदा (२००२) व आफ्रिकेमध्ये एकदा (२०१०) ह्या स्पर्धेचे यजमानपद गेले आहे.