या लेखातील काही मूळ उतारे विकिस्रोत या बंधुप्रकल्पात स्थानांतरित केले जातील तर काही उतारे कॉपीराईट संदिग्धतेमुळे वगळले जातील
छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. याती बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे; तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतिपर लिखाणे ही विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.
शिवाजीमहाराजांवरील ललित साहित्य
शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नाट्येतर ललित साहित्यकृती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे अंग दाखविणारी नाटके/चित्रपट
’आग्ऱ्याहून सुटका’ (नाटक, लेखक विष्णू हरी औंधकर (१९२० च्या सुमारास)
भंगले स्वप्न महाराष्ट्रा (नाटक, लेखक बशीर मोमीन (कवठेकर), १९७५ च्या सुमारास. नाट्य झंकार ग्रुप यांनी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे व्यावसायिक नाट्यप्रयोग केले.
वेडात मराठे वीर दौडले सात (नाटक, लेखक बशीर मोमीन (कवठेकर), १९७७ च्या सुमारास, मळगंगा नाट्यनिकेतन यांनी व्यावसायिक नाट्यप्रयोग केले.
छत्रपती शिवाजी आणि २१वे शतक - व्याख्याते डॉ. गिरीश जखोटिया(२०१३)
जाहले छत्रपती शिवराय (महानाट्य : लेखक व दिग्दर्शक सुदाम तरस) (२०१३)
तीर्थ शिवराय (रंगमंचीय संगीतमय कार्यक्रम, गीते - डॉ. निखिल पाठक. संगीत - जीवन धर्माधिकारी)
फत्तेशिकस्त (मराठी चित्रपट - शिवाजी महाराजांच्या भूमिकेत - चिन्मय मांडलेकर]]; दिग्दर्शक - दिक्पाल लांजेकर)
फर्जंद (मराठी चित्रपट - शिवाजी महाराजांच्या भूमिकेत - चिन्मय मांडलेकर, दिक्पाल लांजेकर)
राजे आणि छत्रपती - लेखक शिवा बागुल (सप्टेंबर २०१४)
रायगडाला जेव्हा जाग येते - नाटक, लेखक वसंत कानेटकर (३-३-२०१३ पर्यंत २४२५ प्रयोग)
लाल महालातील थरारक शिव तांडव (महानाट्य -प्रमुख भूमिका अमोल कोल्हे)
शहाशिवाजी - लेखक य.ना. टिपणीस (१९२० च्या सुमारास)
शिवगर्जना (महानाट्य : लेखक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत) (२०१२)
शिवरायांचे आठवावे रूप’ (महानाट्य- लेखक ऋषिकेश परांजपे).
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक : लेखक राजकुमार तांगडे) (२०१३)
शिवाजीच्या जीवनावरील ॲनिमेशनपट (हिंदी आणि मराठी) - अझहर खान यांच्या ’अमन अनम फिल्म प्रॉडक्शन’ची निर्मिती (ऑगस्ट २०१३)
सांस्कृतिक प्रभाव
शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. यातील काही पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे. तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतीपर लिखाणे विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.
सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांचा पोवाडा लिहिला. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवजयंती या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती
लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवाजीच्या जयंतीनिमित्त ’शिवजयंती’ या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती.
बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ’राजा शिवछत्रपति’ या हजारपानी चरित्रग्रंथाची आतापर्यंत अनेक पुनर्मुद्रणे झाली आहेत. त्याच पुस्तकावर आधारलेले ’जाणता राजा’ हे मोठ्या मैदानावर आणि फिरत्या रंगमंचावर दाखविले जाणारे महानाट्य आहे.
बशीर मोमीन (कवठेकर) यांनी छत्रपती शिवाजी महाराजां नंतरच्या कालखंडाशी संबंधित परंतु शिव छत्रपतींची व्यक्तिरेखा असणारी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' अशी दोन नाटके लिहिली. यातील 'भंगले स्वप्नं महाराष्ट्रा' या नाटकाचे नाट्यझंकार ग्रुप यांनी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे १९७६ मध्ये व्यावसायिक नाट्यप्रयोग केले तर
'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकाचे मळगंगा नाट्य निकेतन यांनी १९७७ मध्ये व्यावसायिक नाट्यप्रयोग केले. यातील, 'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकात श्री. बशीर मोमीन यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम भूमिका केली.
२००० ते २०१४
२४ नोव्हेंबर २००८ पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नितीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेली राजा शिवछत्रपती ही मालिका दूरचित्रवाणीच्या स्टार प्रवाह या वाहिनीवर चॅनेलवर दाखवली गेली.
शिवकल्याण राजा
समर्थ रामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान व युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण, आशयघन व वजनदार अशा शब्दांत तोलले आहे. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या व कार्यकर्तृत्वाच्या प्रत्येक पैलूचा उल्लेख शिवकल्याण राजा या कवनात केलेला आहे.[१]
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण। हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलिया ||
भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला । कित्येकाला आश्रयो जाहला
।शिवकल्याण राजा।
आनंदवनभुवनी
शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दांत केले आहे. हे काव्य म्हणजे छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.[१]
छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अष्टयोग (अंकशास्त्रावरील पुस्तक; लेखक - तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश सुखदेव कदम)
शिवाजीचे उर्दू भाषेतील संक्षिप्त चरित्र (लाला लजपत राय)
शिवाजी व शिवकाल (सर यदुनाथ सरकार; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)
शिवाजी द ग्रँड रिबेल (इंग्रजी, डेनिस किंकेड, १९३०), नवी आवृत्ती - ‘द ग्रँड रिबेल : अॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ (२०१५)
शिवाजी-निबंधावली भाग १ व २ : या दोन खंडांत श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पाडणारे व शिवकालीन परिस्थितीचे वर्णन करणारे अनेक लेख संग्रहित केले आहेत.
पांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे, गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीकर, महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर ओझा, शंकर वामन दांडेकर, श्रीक्रुष्ण व्यंकटेश पुणतांबेकर, भास्कर वामन भट, शिवराम काशीनाथ ओक, सुरेन्द्रनाथ सेन, पंडित वैद्यनाथन शास्त्री तसेच Sir Charles Malet अशा अनेक थोर इतिहास अभ्यासकांचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संबंधित विविध विषयांवरील लेखही या ग्रंथात आहेत.