डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (जन्म : वर्धा, २० डिसेंबर, इ.स. १९५२) हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुखपदावरून ते निवृत्त झाले.
सदस्यत्व स्वीकारण्यास नकार
महाराष्ट्र सरकारने २०१५ साली साहित्य व संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली, त्यावेळी डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांना मंडळावर सदस्यत्व देऊ केले होते. राजकीय तडजोड म्हणून मंडळाचा वापर होत असल्याचा आरोप करून देशपांडे यांनी हे सदस्यत्व नाकारले.
डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची साहित्य सेवा
- अरण्यकांड
- एप्सिलॉन (कवितासंग्रह)
- कथाकार विजया राजाध्यक्ष (समीक्षा)
- किंबहुना (कथासंग्रह)
- गतशतक पत्रिका (माहितीपर, सहलेखिका नंदा आपटे)
- गोट्या या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
- जन्मभूमी (कथासंग्रह)
- पंचमस्तंभ (कथासंग्रह)
- पाताळयंत्र
- प्रचारक (कथासंग्रह)
- युवामानस
- ये सखे ये (कवितासंग्रह)
- राजा शहाजी (ऐतिहासिक कादंबरी)
- राजा शिवछत्रपती या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
- रूपनिरूपण (चाळीस वाङ्मयप्रकारांच्या व्याख्यांची निश्चिती)
- लिटमस
- वैकल्य (कथा-कादंबरी)
- शिवछत्रपती (पटकथामक कादंबरी)
- शोध प्रतिशोध
डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या काही खास कबिता
- आधीच धुमसत होते अंतर, त्यातच ठिणगी पडली जशी................वीर न वेडे पीर निघाले सात शिवाचे तीर
- कलिका कशा ग बाई भुलल्या
- पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
- प्रतिबिंब भंगलेले जुळवून पाहिले मी, रुसल्या मनास माझ्या वळवून पाहिले मी
- फुलती कलिका मन बघते (गायिका मीनल देशपांडे)
- मी तुझीच आहे (गायिका मीनल देशपांडे)
- मी तुझ्याचसाठी सांज सोबती घेते (गायिका मीनल देशपांडे)
- राम तू श्याम तू, (गायिका ऋचा शर्मा, संगीत श्रीधर फ़्डके)
- वारा निघे लपाया । झाडात आड आहे ।। गिल्ला करून पाने । सांगून राहिली की । वारा लबाड आहे ॥१॥ (गायिका अनुराधा पौडवाल, सुधीर फडके)
पुरस्कार आणि सन्मान