मुख्य विश्रांतीस्थळ शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शारजामधून इतर ठिकाणी विमानाने जाण्यासाठी स्वस्त दरात सुविधा देणारी ही एकमेव कंपनी आहे. अलेक्झांड्रिया आणि कासाब्लांका या शहरांवर मुख्य भर दिला गेलेला आहे. एर अरेबिआ ही अरब हवाई वाहतूक संघटनेची सभासद आहे.
इतिहास
३ फेब्रुवारी २००३ रोजी एर अरेबिआ या स्वस्त दरात विमान प्रवास देणाऱ्या कपंनीचीची स्थापना शारजाचे महाराज आणि यूनायटेड अरब आमिरातीच्या सुप्रिम कौन्सिलचे सदस्य डॉ.सुलतान बिन मोहम्मद अल-कासिमी यांनी केली. २८ ऑक्टोबर २००३ रोजी युनायटेड अरब आमिरातीमधील शारजावरून बहारीन आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या विमान प्रवासाने उड्डाणास सुरुवात केली. या कंपनीचा व्यापार स्थापना केल्यापासूनच तेजीत होता. सुरुवातीच्या काळामध्ये ,२००७ मध्ये या कंपनीतील ५५ टक्के समभागामध्ये जनतेचा सहभाग होता.
व्यापारी घडामोडी
मुख्यालय
दुबईपासून १५ किलोमीटर अंतरावर शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर या कंपनीचे मुख्यालय आहे.[१]
जॉइंट व्हेंचर
एर अरेबिआने ईजिप्त, जॉर्डन आणि मोरोक्को या तीन आंतरराष्ट्रीय तळांसाठी त्या त्या शहरांतील कंपनीबरोबर जॉइंट व्हेंचर केलेले आहे.
इजिप्त
एर अरेबिया इजिप्त (२०१० पासून आजपर्यंत) - ९ सप्टेंबर २००९ रोजी एर अरेबिआ यांनी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील इजिप्शिअन प्रवास कंपनी ट्रॅवको समूहाबरोबर संयुक्त करार करून एर अरेबिआ इजिप्त या नावाने विमान वाहतूक कंपनी सुरू केली. या कंपनीला विमान वाहतूकीसाठी २२ मे २०१० रोजी परवाना मिळाला असून १ जून २०१० रोजी विमान उड्डाणास सुरुवात केली. या कंपनीच्या ताफयात ३ विमाने, २ स्थानिक सेवा देणारी विमाने आणि युरोप मधून लाल समुद्रापर्यंत जाणारे १ चार्टर विमान यांचा समावेश आहे.
जॉर्डन
एर अरेबिआ जॉर्डन (टीबीए) - ७ जून २०१०, रोजी एर अरेबिआ यांनी जॉर्डनमधील तंताश समूहाबरोबर संयुक्त करार करून एर अरेबिआ जॉर्डन ही कंपनी अस्तित्वात आली. या कंपनीने भविष्यामध्ये राणी एलीआ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यूरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका शहरांपर्यंत उड्डाण करण्याचे निश्चित केलेले आहे.[२] १४ जून २०११ रोजी स्थानिक अस्थिरता आणि इंधन दर वाढीमुळे कंपनीने सदरहू योजना लांबवणीवर टाकल्याचे जाहिर केलेले आहे.[३]
मोरोक्को
एर अरेबिआ मरोक (२००९ - आतापर्यंत) – मोरोक्कोन इनव्हेस्टर बरोबर एकत्रित करार करून एर अरेबिआ मोरोक्कोची स्थापना झाली आणि ६ मे २००९ पासून कॅसाब्लान्स या मोरोक्कोमधील सर्वांत मोठया शहरामध्ये कार्यान्वीत करण्यात आली आणि नंतर ही सेवा युरोप आणि आफ्रिकापर्यंत वाढविण्यात आली.
या कंपनीच्या ताफयामध्ये ४ विमानांचा समावेश असून युरोपियअन स्थानकांवर सेवा दिली जाते.
नेपाळ
फलाय येटी (२००७-२००८) २००७ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे आशिया आणि मध्य पूर्व शहरांना जोडण्यासाठी यूटी एरलाइन्स बरोबर एकत्रित करार केला आणि स्वस्त दरात विमानप्रवासासाठी फलाय येटी या नावाने कंपनी अस्तित्वात आली. आंतराराष्ट्रीय स्थानकांवर सुद्धा उड्डाण करण्यात आले. परंतु नेपाळ मधील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे आणि सरकारचा पाठिंबा न मिळाल्यामुळे फलाय येटी २००८ मध्ये बंद करावी लागली.
स्थानके
फेब्रुवारी २०१४ रोजी एर अरेबिआची मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, आशिया आणि यूरोप आणि हल्ली कैरो, इजिप्त शहरांमधून ९० विमानतळांवर विमानप्रवास सेवा दिली जाते.[४][५][६]
विमाने
फेब्रुवारी २०१४ रोजी एर अरेबिआच्या विमानांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.[७][८]