इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७९ - फेब्रुवारी १९८० दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली. ही कसोटी मालिका द ॲशेस अंतर्गत मोजली गेली नाही. इंग्लंडने या दौऱ्यादरम्यानच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.