२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका ही मे २०१७ मध्ये आयर्लंड येथे खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती.[१] सदर मालिका आयर्लंड, बांगलादेश न्यूझीलंड ह्या देशांदरम्यान खेळवली गेली.[२] जून २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीची पूर्वतयारी म्हणून सदर मालिकेचे आयोजन केले गेले.[३] क्रिकेट आयर्लंडने जुलै २०१६ मध्ये मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.[४] एकदिवसीय मालिकेआधी, आयर्लंड संघ दोन सराव सामने खेळला; बांगलादेशविरुद्ध ५०-षटकांचा आणि न्यू झीलंड विरुद्ध २५-षटकांचा.[५]
मालिकेआधी, एप्रिल २०१७ मध्ये, बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझावर श्रीलंका आणि बांगलादेश दरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने एका सामन्याची बंदी लादण्यात आली.[६]
पाचव्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा १९० धावांनी पराभूत करून न्यू झीलंडने मालिकेत विजय मिळवला.[७]
संघ
न्यू झीलंड क्रिकेटने (NZC) एप्रिल २०१७ च्या सुरुवातीला आपला एकदिवसीय संघ जाहीर केला, ज्यात आयपीएल २०१७ मुळे उपलब्ध नसलेल्या दहा खेळाडूंचा समावेश होता.[१०] जीतन पटेल चवथ्या सामन्यात आणि इतर खेळाडू वेळेनुसार संघात समाविष्ट झाले.[१०] अॅडम मिलने, कोरे अँडरसन आणि मॅट हेन्री ह्यांचा आयर्लंडविरुद्ध २१ मे २०१७ च्या सामन्याआधी न्यू झीलंड संघात समावेश करण्यात आला.[११]
गुणफलक
- स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो[१२]
सराव सामने
५०-षटके: आयर्लंड अ वि बांगलादेशी
- नाणेफेक : बांगलादेशी, फलंदाजी.
- प्रत्येकी १३ खेळाडू, ११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक.
२५-षटके: आयर्लंड अ वि न्यूझीलँडर्स
- नाणेफेक : न्यूझीलँडर्स, फलंदाजी.
- प्रत्येकी १२ खेळाडू, ११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक.
एकदिवसीय सामने
१ला ए.दि. सामना
- नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- बांगलादेशच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ थांबवला गेला आणि नंतर पुन्हा सुरू होवू शकला नाही.[१३]
- गुण: आयर्लंड २, बांगलादेश २.
२रा एकदिवसीय सामना
३रा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
- संपूर्ण सभासदांदरम्यान ह्या मैदानावरील हा पहिलाच सामना.[१६]
- गुण: न्यू झीलंड ४, बांगलादेश ०.
४था एकदिवसीय सामना
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: सुन्झामुल इस्लाम (बां).
- गुण: बांगलादेश ४, आयर्लंड ०.
५वा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
- गुण: न्यू झीलंड ४, आयर्लंड ०.
६वा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
- हा बांगलादेशचा न्यू झीलंडविरुद्ध परदेशातील पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.[१७]
- महमुदुल्लाह हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा करणारा पाचवा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.[१७]
- गुण: बांगलादेश ४, न्यू झीलंड ०.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
|
---|
|
मे २०१७ | |
---|
जून २०१७ | |
---|
जुलै २०१७ | |
---|
ऑगस्ट २०१७ | |
---|
सप्टेंबर २०१७ | |
---|
सध्या सुरु असलेल्या स्पर्धा | |
---|
|