स्तानिस्लास वावरिंका (जर्मन: Stanislas Wawrinka; २८ मार्च १९८५) हा एक व्यावसायिक स्विस टेनिसपटू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या वावरिंकाने २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत रॉजर फेडरर सोबत पुरूष दुहेरी टेनिससाठी सुवर्णपदक पटकावले.
२०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने एकेरीमध्ये रफायेल नदालला पराभूत करून आपले पहिले ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळवले. २०१५ साली त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजय मिळवून दुसरे तर २०१६ यू.एस. ओपन जिंकून तिसरे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळवले.
वावरिंका आजवर एकूण ११ प्रमुख स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोचला असून त्याने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे.
कारकीर्द
ग्रँड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या: ३ (३ - ०)
ऑलिंपिक स्पर्धा
पुरुष दुहेरी: १ (१–०)
बाह्य दुवे