मनोहर जोशी

मनोहर जोशी

कार्यकाळ
१४ मार्च इ.स. १९९५ – ३१ जानेवारी इ.स. १९९९
मागील शरद पवार
पुढील नारायण राणे

कार्यकाळ
१० मे इ.स. २००२ – ४ जून इ.स. २००४
मागील जी.एम‌.सी.बालयोगी
पुढील सोमनाथ चॅटर्जी

जन्म २ डिसेंबर, १९३७
मृत्यू २३ फेब्रुवारी, २०२४ (वय ८६)[]
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
धंदा राजकारण
धर्म हिंदू

मनोहर जोशी (डिसेंबर २, १९३७ - २३ फेब्रुवारी, २०२४) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. १४ मार्च, इ.स. १९९५ ते ३१ जानेवारी, इ.स. १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ ते इ.स. २००२ या काळात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते, तर इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते. ते शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते.

पूर्वेतिहास

मनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन आठवड्यातील सात दिवसांच्या सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले.

नंतर मुंबईत आल्यावर महापालिकेत त्यांनी ॲक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावर नोकरीला लागले. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले.मुंबईत [कोहिनुर टेक्निकल इन्स्टिट्यूट] या नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले. पुढे बाळ ठाकरे यांची भेट झाल्यावर दिवस पालटले आणि मनोहर जोशी यांची राजकारणात भरभराट झाली.

मनोहर जोशी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्था

  • कोहिनूर क्लासेस (दादर-मुंबई,)
  • मनोहर जोशी कॉलेज ऑफ आर्ट्‌स, सायन्स अँड कॉमर्स (धारावी-मुंबई)
  • कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (मुंबईत अंधेरी, कल्याण, घाटकोपर, दादर, आणि मुंबईबाहेर अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, रत्‍नागिरी, सांगली वगैरे एकूण ४० ठिकाणी)
  • कोहिनूर हॉटेल मॅनेजमेन्ट अँड टूरिझम कॉलेज (दादर-मुंबई), वगैरे वगैरे.

मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आयुष्य कसे जगावे? (प्रकाशन - २-१२-२०१६)

संदर्भ

  1. ^ "महाराष्ट्र के पूर्व सीएम मनोहर जोशी का निधन, हार्ट अटैक से हुई मौत". आजतक. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे


मागील
जी.एम‌.सी.बालयोगी
लोकसभेचे अध्यक्ष
मे १०, इ.स. २००२ - जून ४,इ.स. २००४
पुढील
सोमनाथ चॅटर्जी
मागील
शरद पवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मार्च १४, इ.स. १९९५ - जानेवारी ३१, इ.स. १९९९
पुढील
नारायण राणे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!